अजितदादांच्या बैठकीत सोलापूरला मिळाले 74 कोटी रुपये 

meeting
meeting

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी 2020-21 वर्षासाठी तयार केलेल्या नियोजन आराखड्यात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 74 कोटी 45 लाख रुपयांची वाढ केली आहे. पुण्यातील विधानभवनात आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही मान्यता देण्यात आली. या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार यशवंत माने, आमदार रामहरी रूपनवर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते. 
हेही वाचा - खासदारांचे पुरावे पडताळणीसाठी दक्षता समितीकडे 
रविवारी झालेल्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या 349 कोटी 87 लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली होती. आजच्या राज्यस्तरीय बैठकीत 116 कोटी रुपयांची मागणी करणार असल्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार बैठकीत अधिकाची मागणी करण्यात आली होती. वित्तीय मर्यादा लक्षात घेता 74 कोटी रुपयांच्या अधिकचा निधी देण्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय नियोजनाच्या शेवटच्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याला आणखी निधी मिळावा अशी अपेक्षा पालकमंत्री वळसे-पाटील यांनी व्यक्त केली. 
हेही वाचा - "शक्तिमान'बाबतचे हे गुपित तुम्हाला माहितेय का? 
या बैठकीसाठी सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जलसंपदा विभागांचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता शेखर साळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, सहायक नियोजन अधिकारी दिलीप पवार, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप ढेले आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com