ट्रकचालक, क्‍लीनरला मारहाण करून लुटले 

Solapur pune highway of truck driver and cleaner robbed
Solapur pune highway of truck driver and cleaner robbed

टेंभुर्णी (सोलापूर) : सोलापूर-पुणे महामार्गावर वेणेगावनजीक मालट्रक चालक व क्‍लीनरला मारहाण करून चार चोरट्यांनी वाहनचालक परवाना, आधारकार्ड व रोख साडेसात हजार रुपये ठेवलेले पाकीट व एक मोबाईल असा एकूण साडेपंधरा हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली असून टेंभुर्णी पोलिस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
मालट्रक चालक देवीदास विश्‍वनाथ कांबळे (वय 44, रा. मुळेवाडी मदनसुरी, ता. निलंगा, जि. लातूर) व मुलगा आकाश (क्‍लीनर) हे दोघेजण बसवकल्याण येथून मालट्रकमध्ये (केए 56/3346) हळद घेऊन पनवेल (जि. रायगड) येथे निघाले होते. सोलापूर-पुणे महामार्गावर वरवडे टोलनाक्‍याच्या पुढील बाजूस मालट्रक आल्यानंतर मागील बाजूच्या टायरमधून हवा जात असल्याचा आवाज आला. त्यामुळे गॅरेज अथवा टायरचे दुकान कोठे दिसते का हे पाहात ट्रक हळूहळू चालवीत पुढे निघाले. रात्री नऊच्या सुमारास वेणेगाव पाटीजवळ मालट्रक आली असता अचानक दोन दुचाकीवरून चार तरुण आले. त्यापैकी एक दुचाकी ट्रकच्या उजव्या बाजूने येऊन थांबली व दुसरी दुचाकी ट्रकच्या समोर येऊन थांबली. त्याच्यापैकी मागे बसलेल्या तरुणाने "तुझा माल पडत आहे असे म्हणाला.' परंतु त्याच्याकडे पाहून ते चोर असावेत अशी शंका आल्याने ट्रकचालकाने ट्रक थांबविला नाही. त्यामुळे एक तरुण डाव्या बाजूने व दुसरा उजव्या बाजूने ट्रकमध्ये घुसला. त्यांनी ट्रकचालक व क्‍लीनरला हाताने मारहाण करून पैसे मागितले. त्यावेळी ट्रकमालक तय्यब शेख याने खर्चासाठी दिलेल्या आठ हजार रुपयांतून 500 रुपये खर्च झाल्याने शिल्लक राहिलेले साडेसात हजार रुपये व चालकाचा परवाना, आधारकार्ड ठेवलेले पाकीट व केबीनमध्ये ठेवलेला आठ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण साडेपंधरा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ट्रकचालक व क्‍लीनर घाबरले होते. तेथून जवळ असलेल्या भारत पेट्रोल पंपामध्ये मालट्रक घेऊन गेले. तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना धीर दिला. नंतर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात येऊन ट्रकचालक देवीदास कांबळे यांनी फिर्याद दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com