उष्णतेच्या लाटेत सोलापूर होरपळले; पारा 45 अंश सेल्सिअसवर 

Solapur temperature at 45 degrees Celsius
Solapur temperature at 45 degrees Celsius

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. भारतीय हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट जाहीर केली असून कोरोना सोबतच आता उष्ण तापमानाचा सामनाही सोलापूरकरांना करावा लागत आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज सोलापूर शहर व परिसरात झाली. या तापमानात सोलापूर अक्षरशः होरपळून निघत आहे. 
28 मेपर्यंत सोलापुरात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्यानंतर 29, 30 व 31 मे या दिवशी सोलापूरचे तापमान 46 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद आज झाली आहे. सलग तीन दिवसापासून सोलापूरचे तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील नवनवीन उच्चांक करत आहेत. 23 मे रोजी 44.2 अंश सेल्सिअस, 24 मे रोजी 44.5 अंश सेल्सिअस आणि आज 25 मे रोजी सोलापूरचा पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सलग तीन दिवस उष्ण तापमान, उकाडा, उष्ण झळा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. गेल्या वर्षी 2019 मध्ये 22 मे रोजी 45 अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यापूर्वी 20 मे 2005 रोजी 45.1 एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद सोलापूर शहर व परिसरात झाली होती. रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला असून या नक्षत्रातील पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com