परप्रांतीयांना घेऊन पटना येथे निघाली श्रमीक एक्स्प्रेस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

यापूर्वी स्थानिक जिल्हा प्रशासन व रेल्वे खात्याने एकत्र येत उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील नागरिकांना त्यांच्या गावाकडे पाठवण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडल्या होत्या. त्यानंतर बिहार येथील हजारो नागरिक अडकले होते. जिल्हाभरात हॉटेल, बांधकाम, चाट विक्री व्यवसाय यासह अनेक ठिकाणी हे परप्रांतीय काम करत होते. दोन महिन्यांपासून त्यांना त्यांच्या गावाकडे पोचणे अशक्‍य झाले होते. 

सोलापूरः जिल्हाभरात लॉकडाउनने अडकलेल्या परप्रांतीयांसाठी आज विशेष श्रमिक रेल्वे सोलापूर रेल्वे स्थानकावरून पटना येथे सोडण्यात आली. एक हजार 280 प्रवाशांना घेऊन ही शुक्रवारी (ता.22) ला रेल्वे निघाली. 

हेही वाचाः कोरोना योध्द्यांचे आत्मबल वाढवण्यासाठी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे आंदोलन 

यापूर्वी स्थानिक जिल्हा प्रशासन व रेल्वे खात्याने एकत्र येत उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील नागरिकांना त्यांच्या गावाकडे पाठवण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडल्या होत्या. त्यानंतर बिहार येथील हजारो नागरिक अडकले होते. जिल्हाभरात हॉटेल, बांधकाम, चाट विक्री व्यवसाय यासह अनेक ठिकाणी हे परप्रांतीय काम करत होते. दोन महिन्यांपासून त्यांना त्यांच्या गावाकडे पोचणे अशक्‍य झाले होते. 

हेही वाचाः लॉकडाउनमध्ये बोकाळू लागली खासगी सावकारी 

आज सकाळपासून महसूल प्रशासनाने बिहार येथील नागरिकांना रेल्व स्थानकावर पाचारण केले होते. शहरातील मनपा व पोलिस आयुक्त कार्यालयसह अनेक नागरिक तालुक्‍याच्या ठिकाणी अडकले होते. त्यांच्यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात आली होती. प्रांत अधिकारी ज्योती पाटील, पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर आणि रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानकाबाहेर तपासणी, नोंदणीचे नियोजन केले. त्यानंतर या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. त्यानंतर शासनाच्या वतीने रेल्वे खात्याकडे भरण्यात आलेल्या रकमेची तिकिटे वाटप करण्यात आली. 
त्यानंतर सर्व एक हजार 280 प्रवाशांना रेल्वेत बसवले. त्यांना फूड पॅकेटसचे वाटप केले. सायंकाळी 4 वाजता ही रेल्वे पटनाकडे रवाना झाली. सर्व तहसील कार्यालयात परप्रांतीयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. मजूर व नागरिकांनी त्यांच्या परप्रांतातील मूळ गावाकडे पायी न जाता येथे नोंदणी करावी. यापूर्वी सोलापूर रेल्वे स्थानकावरून ग्वाल्हेरकडे गाडी सोडण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशात लखनऊला जाणारी रेल्वे सोडली. उत्तर प्रदेशला जाणाऱ्या रेल्वेत एकूण एक हजार 600 नागरिकांना पाठवले. आणखी काही राज्यात रेल्वे पाठवून तेथील नागरिकांना मूळ गावाकडे पाठवण्याचे नियोजन करत आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special train departure for bihar passanges