पुणे-सोलापूर महामार्गावर सावळेश्वर येथे रास्ता रोको 

SWABHIMANI.JPG
SWABHIMANI.JPG

सोलापूरः ऊसाला एफआरपीप्रमाणे दर मिळावा, केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत, यासह विविध मागण्यांसाठी सोलापूर-पुणे महामार्गावर स्वाभिमानी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली सावळेश्‍वर येथे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी उपाध्यक्ष पप्पु पाटील, सदाशिव वाघमोडे, सनिराज पाटील, विजय साठे, दिनेश शिंदे, पोपट साठे, श्रीपती ढोणे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. श्री. रणदिवे म्हणाले, ""केंद्र सरकारने लोकसभेत आणि राज्यसभेत शेतकरी विरोधातील कायदे केले आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना काही कार्पोरेट कंपन्यांचे गुलाम बनून रहावे लागेल, या कायद्यात हमीभावाचा कुठेही उल्लेख नसल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक होईल. हा कायदा करून सरकार शेतकऱ्यांच्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकरी हितासाठी कायदे रद्द करावेत, यंदाचे ऊस कारखान्यांचे गाळप कारखान्यांनी एफआरपी जाहीर केल्याशिवाय चालू करु नये, प्रशासनाने त्याबाबत लक्ष द्यावे.'' 

जिल्हा उपाध्यक्ष पाटील यांनी काही साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीच्याच हंगामातील एफआरपीची बिले अद्याप दिली नाहीत. या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी केली. यावेळी मागण्यांचे निवेदन पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांना देण्यात आले. 


इथे झाले रास्ता-रोको 
पंढरपूर-टेंभुर्णी रोडवर भोसेपाटी, सोलापूर- पुणे रोडवर सावळेश्वर, कुर्डूवाडी बार्शी रोडवर रिधोरे, सोलापूर- बार्शी रोडवर राळेरास, टेंभुर्णी-नगर रोडवर जातेगाव, अकलूज- सांगोला रोडवर मळोली, पंढरपूर-कराड रोडवर महुद, सोलापूर मंगळवेढा रोडवर माचणुर याठिकाणी ही आंदोलने झाली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com