ऊस तोडणी मजुरांचे कचरेवाडी येथील कोयता बंद आंदोलन आश्वासनानंतर स्थगित

हुकूम मुलानी
Wednesday, 21 October 2020

महाराष्ट्रात विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये भाजप आ. गोपीचंद पडळकर यांच्या तालुक्‍यातील नंदेश्वर येथे ऊसतोडणी मजूर, मुकदम यांच्या विविध मागण्या च्या संदर्भात बैठक आ. गोपीचंद पडळकर त्यांच्या नेतृत्वाखाली घेऊन स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर व वाहतूक संघटनेच्या वतीने राज्यभरात केलेल्या कोयता बंद आंदोलनाचा इशारा साखर आयुक्त व महाराष्ट्र सरकार यांना इशारा देण्यात आला. 

मंगळवेढा (सोलापूर) ः भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर सुरू करण्यात आलेल्या कोयता बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील कचरेवाडी येथील युटोपीयन कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार यांच्या प्रश्नावर इतर कारखाने जे तोडगा काढतील त्याप्रमाणे त्यांच्या तोडणी मजुर व वाहतूकदारांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर कारखान्यासमोर केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले 

हेही वाचाः नंदकुमार मुस्तारे यांचे कार्य दिर्घकाळ स्मरणात राहील ः धर्मराज काडादी 

महाराष्ट्रात विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये भाजप आ. गोपीचंद पडळकर यांच्या तालुक्‍यातील नंदेश्वर येथे ऊसतोडणी मजूर, मुकदम यांच्या विविध मागण्या च्या संदर्भात बैठक आ. गोपीचंद पडळकर त्यांच्या नेतृत्वाखाली घेऊन स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर व वाहतूक संघटनेच्या वतीने राज्यभरात केलेल्या कोयता बंद आंदोलनाचा इशारा साखर आयुक्त व महाराष्ट्र सरकार यांना इशारा देण्यात आला. 

हेही वाचाः बारा लाखांच्या शहरात 89 हजार टेस्ट ! आज 19 पॉझिटिव्ह अन तिघांचा मृत्यू 

ऊस तोडणी वाहतूक दाराचा मागील 20 टक्के फरक मिळावा,ऊसतोड मजूर व बैलाचा विमा उतरवला पाहिजे बैलाच्या वैद्यकीय खर्चाची व्यवस्था कारखानदारांनी केली पाहिजे. ऊसतोड मजूर कामगारांच्या मजुरीमध्ये वाढ व्हावी.वाहतूकदारांच्या वाहतुकीमध्ये वाढ मिळावी मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी.कष्टाने ऊसतोड करून मजूर बैलगाडीने व इतर वाहनांनी वाहतूक केलेल्या उसाची कारखानदारांकडून काटामारी केल्यामुळे त्यांच्या कष्टाला घामाला योग्य दर मिळत नाही. त्यास एफआरपीप्रमाणे दर मिळावा. राज्यातील ऊस तोडणी मजुरांची सरकार दप्तरी नोंद करून त्यांच्या बाजूचा कायदा व दरवाढीसाठी विषय जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यंत मजुर कोयता हातात घेणार नाही.असा इशारा दिला होता. युटोपीयन शुगर्स या कारखान्याच्या गेटवर ऊस भरून आलेली वाहने अडवून आंदोलन बापूसाहेब मेटकरी, धनाजी गडदे, नवनाथ वाघमोडे, नागेश मोटे, शिवाजी टकले, शत्रुघ्न शिंदे,आनंदा पडवळे,अनिल मदने, विश्वास खुळे, इंद्रजीत ताड, प्रकाश ताड, भाऊसाहेब मेटकरी यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू करण्यात आले होते 

संपादनः प्रकाश सनपूरकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane harvesting workers' agitation at utopian factory