नंदेश्वरच्या उच्चशिक्षित लेकींची राजकारणात एन्ट्री; सुरेखा गरंडे यांची सरपंचपदी तर लक्ष्मी चौंडे यांची उपसरपंचपदी निवड

Surekha Garande from Nandeshwar village has been elected as Sarpanch.jpg
Surekha Garande from Nandeshwar village has been elected as Sarpanch.jpg

पाटकळ (सोलापूर) : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील सुरेखा विठ्ठल गरंडे-पुकळे यांची घेरडी (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नुकतीच निवड झाली. त्याचबरोबर नंदेश्वर येथील लक्ष्मी तुकाराम चौंडे-घुणे यांची वाणीचिंचाळे (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली आहे. त्याचबरोबर कासेगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी प्रतिक्षा सुनील कसबे-जाधव यांची निवड झाली असून त्यांची अडीच वर्षानंतर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड होणार आहे. या सर्व तिनही उच्चशिक्षित नंदेश्वरच्या लेकींनी भरघोस मतांनी विजय मिळवून ग्रामपंचायतीमध्ये यश प्राप्त केले असून या त्यांच्या निवडीबद्दल नंदेश्वर येथील ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करुन फटाक्यांची आतषबाजी व चहापाणी करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

सुरेखा विठ्ठल गरंडे यांचे प्राथमिक शिक्षण नंदेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसनेरवस्ती नंदेश्वर येथे माध्यमिक शिक्षण श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर व प्रगती विद्यालय वाणीचिंचाळे येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण सांगोला येथे व डिग्रीचे शिक्षण सोलापूर येथे पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर नंदेश्वर येथीलच लक्ष्‍मी तुकाराम चौंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदेश्वर, माध्यमिक शिक्षण श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर तर उच्च माध्यमिक शिक्षण सांगोला येथे पूर्ण झाले असून डिग्रीचे शिक्षण पुणे येथे झाले आहे.

प्रतीक्षा सुनील कसबे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदेश्वर येथे तर माध्यमिक शिक्षण श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण व डिग्रीचे शिक्षण मंगळवेढा येथे पूर्ण झाले आहे. नंदेश्वरच्या या लेकींनी उच्च शिक्षण घेऊन 'हम भी किसीसे कम नही' म्हणत दमदार राजकारणात प्रवेश केलेला आहे व पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ प्राप्त झालेली आहे. आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग आपल्या गावासाठी करून खऱ्या अर्थाने आपले गाव सुजलाम-सुफलाम करून एक आदर्श गाव बनवू असे नूतन निवड झालेल्या या नंदेश्वरच्या लेकींनी दै.सकाळशी बोलताना सांगितले. या नंदेश्वरच्या लेकीचे सासरसह माहेरघर असलेल्या नंदेश्वरसह पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com