बायकोच्या मामावर तलवार उगारली : वाचा सोलापूर गुन्हे वृत्त 

अमोल व्यवहारे
Friday, 4 December 2020

सोलापूर : बनावट दस्त करून शासनाची व इतर लोकांची फसवणुक केल्याप्रकरणी विकास तळभंडारे व त्याच्याशी संबंधित लोकांविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरेखा आबासाहेब साबळे (वय 52, रा. अंत्रोळीकर नगर नं. 1, होटगी रोड, सोलापूर) या महिलेने फिर्याद दाखल केली आहे. बनावट दस्त करून विकास तळभंडारे व त्याच्या साथीदारांनी बनावट उतारा तयार करून सुरेखा साबळे यांची नोंद न करता ती जागा स्वत:च्या मालकीची असल्याचे भासवून नागेश यल्लप्पा जाधव, सुरेखा हणमंत शेळके यांना विक्रि केली. तशी नोंद सातबाऱ्यास करून शासनाची फसवणुक केल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत. 

सोलापूर : बायकोच्या मामाला तलवार उगारणाऱ्या पतीविरूध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली विजय सुरवसे (वय 30 रा. रत्नमंजिरी नगर, जुळे सोलापूर) या महिलेच्या फिर्यादीवरुन विजय जीवन सुरवसे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय हे घरी गोंधळ करीत असताना पत्नी सोनाली हिने तिची आई व मामा यांना बोलावून घेतल्यानंतर विजय याने सोनालीच्या मामावर तलवार उचलली. त्यावेळी मध्ये सोनालीची आई आल्याने त्यांना तलवारी लागून त्या जखमी झाल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. पोलिस नाईक उपासे तपास करीत आहेत. 

हेही वाचाः आमदार संजयमामा शिंदे ठरले महाविकासच्या एकीकरणाचा आश्‍वासक चेहरा 

बनावट दस्त करून फसवणुक 
सोलापूर : बनावट दस्त करून शासनाची व इतर लोकांची फसवणुक केल्याप्रकरणी विकास तळभंडारे व त्याच्याशी संबंधित लोकांविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरेखा आबासाहेब साबळे (वय 52, रा. अंत्रोळीकर नगर नं. 1, होटगी रोड, सोलापूर) या महिलेने फिर्याद दाखल केली आहे. बनावट दस्त करून विकास तळभंडारे व त्याच्या साथीदारांनी बनावट उतारा तयार करून सुरेखा साबळे यांची नोंद न करता ती जागा स्वत:च्या मालकीची असल्याचे भासवून नागेश यल्लप्पा जाधव, सुरेखा हणमंत शेळके यांना विक्रि केली. तशी नोंद सातबाऱ्यास करून शासनाची फसवणुक केल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत. 

हेही वाचाः पत्नीच्या निधनानंतर कामगाराने तिन्ही मुलांना बनवले इंजिनिअर 

80 हजारांची सोन्याची अंगठी लंपास 
सोलापूर : भविष्य सांगतो असे सांगून एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या चौघांनी सुरेश विठो गायकवाड (वय 68, रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) यांची 80 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी लंपास केली. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 नोंव्हेंबर रोजी पुणे रोडवरील डाळींब संशोधन केंद्रासमोर घडली. पोलिस नाईक हार पुढील तपास करीत आहेत. 

5 लाखांची फसवणुक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल 
सोलापूर : फायनान्सने ओढून आणलेला व नंतर विक्रि केलेल्या ट्रॅक्‍टरवर 5 लाख 15 हजार रुपये कर्ज काढून फसवणुक करणाऱ्या कर्नाटकातील बेनूर तांड्यावरील चौघांविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसवराज इरप्पा पाटील, गुरूबाळ बसवराव पाटील, शंकऱ्याप्पा बसवराज पाटील (सर्व रा. निंगदळी, बेनूर तांडा, ता. इंडि, जि. विजयपूर, कर्नाटक), नागप्पा करबसप्पा बिरादार (रा. इंडी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेवणसिध्द अंदप्पा मळेवाडी (वय 34 रा. हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पाटील यांनी मळेवाडी यांना विकून त्यांच्याकडून रोख रक्‍कम व फायनान्सचे पैसे भरून घेतले. तसेच नंतर त्याच ट्रॅक्‍टरवर फायनान्सचे कर्ज काढून त्यांची फसवणुक केली. पोलिस हवालदार चव्हाण तपास करीत आहेत. 

पोलिसाच्या मारहाणीत एक जखमी 
सोलापूर : जेलरोड पोलिस ठाण्याच्या आवारात एका पोलिसांनी मारहाण केल्याने विकास राजेंद्र एकंबे (वय 25, रा. मालेगाव, ता. लोहा, जि. उस्मानाबाद) हा तरूण जखमी झाला. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून एकंबे यास मारहाणीचे कारण समजू शकलेले नाही. जखमी अवस्थेत विकास एकंबे हा स्वत:हून शासकीय रुग्णालयात दाखल झाला असून तो बेशुध्द आहे. याबाबत सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

दुचाकी खड्ड्यात जाऊन महिला मृत्यूमुखी 
सोलापूर : जावयाबरोबर दुचाकीवरून येत असताना दुचाकी खड्ड्यात गेल्याने पडून जखमी झालेल्या सासूचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना अक्‍कलकोट तालुक्‍यातील शावळजवळ गुरुवारी सायंकाळी घडली. निर्मला ब्रम्हा शिवशरण (वय 42, रा. शावळ, ता. अक्‍कलकोट) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी निर्मला या त्यांचे जावई मुकेश कांबळे याच्यासोबत दुचाकीवरून लग्न कार्य उरकून गावाकडे जात होत्या. त्यावेळी गावाच्या अलीकडे दुचाकी खड्ड्यात गेल्याने तोल जाऊन निर्मला पडल्या व त्यांच्या डोक्‍याला गंभीर जखम झाली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sword raised against wife's uncle: Read Solapur Crime News