पालखी मिरवणुकीने रुपाभवानीचे सीमोल्लंघन : संबळ व झांज वादनासह "उदो उदो' चा गजर 

शाम जोशी
Sunday, 25 October 2020

यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देवीची पालखी मिरवणूक साधेपणाने झाली. पार्क मैदानावर होणारे सीम्मोलंघन झाले नाही. त्यामुळे मंदिराच्या आवारातच पारंपारिक संबळ व झांज वादनाच्या निनादात व आई राजा उदो उदो च्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. आज सकाळी दसऱ्याची अलंकार पूजा मनिष मसरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सुनिल, अनिल व मल्लिनाथ मसरे उपस्थित होते. सकाळी नित्य पूजा झाल्यानंतर रुद्राभिषेक करण्यात आला. 

दक्षिण सोलापूर(सोलापूर) ः रुपाभवानी मंदिरात दसऱ्यानिमित्त आज (ता.25) सकाळी अलंकार महापूजा करण्यात आली. तर सायंकाळी देवीचे मंदिर परिसरातच पालखी मिरवणुकीने सीमोल्लंघन झाले. शहरभरात साधेपणाने विजयादशमीचा सण साजरा करण्यात आला मात्र, लोकांचा उत्साह पूर्वी इतकाच कायम होता. पार्कचौकातील शमीच्या वृक्षाजवळ पोलिस बंदोबस्त होता. वृक्ष परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. रुपाभवानी मंदिरास शहरातील सर्वच देवी मंदिरात पुजारी व मानकऱ्यांव्यतिरिक्त इतर भाविकांना प्रवेश वर्ज्य होता. 

हेही वाचाः मोबाईल कव्हर करणाऱ्या बार्शीच्या प्रतीक्षा थोरात 

यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देवीची पालखी मिरवणूक साधेपणाने झाली. पार्क मैदानावर होणारे सीम्मोलंघन झाले नाही. त्यामुळे मंदिराच्या आवारातच पारंपारिक संबळ व झांज वादनाच्या निनादात व आई राजा उदो उदो च्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. आज सकाळी दसऱ्याची अलंकार पूजा मनिष मसरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सुनिल, अनिल व मल्लिनाथ मसरे उपस्थित होते. सकाळी नित्य पूजा झाल्यानंतर रुद्राभिषेक करण्यात आला. 

हेही वाचा ः सोलापूरच्या ग्रामीण भागात 107 नवे कोरोना बाधित 

दरम्यान मंदीरातील नवरात्रोत्सवाची सांगता काल (ता.24) सकाळी 11 वाजता महापूजेनंतर घटोत्थापनाने झाली. तर मंदिरात शुक्रवारी (ता.23) महाष्टमीचा होम करण्यात आला. या होम विधीसाठी अनिल व सौ. अर्चना मसरे यांनी यजमानपद सांभाळले. शिवयोगी शास्त्री यांनी पौरोहित्य केले. 
आज दसऱ्यानिमित्त सायंकाळी साडेसहा वाजता देवीची पालखीतून मंदिराच्या आवारातच मिरवणूक काढण्यात आली. यावेळीच देवीचे सीम्मोलंघन विधीही झाला. यावेळी पारंपारीक संबळ वादन व झांज वादन करण्यात आले. सीम्मोलंघनानंतर देवीची महारती करण्यात आली. मंदिराच्या गर्भगृहाचा दरवाजा बंद करण्यात आला. 

शमीच्या वृक्षाजवळ बंदोबस्त 
पार्क चौकात प्रतीवर्षी मोठ्या उत्साहात साजरे होणारे सीमोल्लंघन यंदा झाले नाही. या वृक्षाच्या परिसरात येणारे सर्व मार्ग पोलिसांनी अडथळे लावून बंद केले होते. लोकांनी घरीच साधेपणाने सीमोल्लंघन केले. झेंडूच्या फुलांची व सोनेरुपी आपट्याच्या पानांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. रविवारी सकाळपासून बाजारात फुलांचा तुठवडा होता.  
 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Symbol violation of Rupabhavani by palanquin procession: "Udo Udo" alarm with Sambal and Zanj playing