esakal | तरुणांनो खुशखबर ! ठाकरे सरकारची एक लाख एक हजार पदांची मेगाभरती 
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray

अपडेट माहिती संकलनाचे काम युध्दपातळीवर 
शासनाच्या विविध विभागांमधील रिक्‍त पदांची अपडेट माहिती संकलनाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. वित्त विभागाच्या निर्णयानुसार एकूण रिक्‍त पदांच्या 50 टक्‍के रिक्‍त पदांची भरती होईल. महापरीक्षा पोर्टल बंद केल्यानंतर भरती प्रक्रियेच्या दृष्टीने संपूर्ण तयारीसाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागेल. त्या नियोजनानुसार मेगाभरतीला सुरवात होईल. 
- गजानन गुरव, अप्पर सचिव, सामान्य प्रशासन, मुंबई 

तरुणांनो खुशखबर ! ठाकरे सरकारची एक लाख एक हजार पदांची मेगाभरती 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार पदांच्या मेगाभरतीत आणखी 29 हजार पदांची वाढ होणार आहे. दोन लाख रिक्‍त पदांपैकी 50 टक्‍के पदांच्या भरतीचा निर्णय वित्त विभागाने घेतला. त्यानुसार शासकीय विभागांमधील रिक्‍त पदांची माहिती नव्याने संकलित करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागातर्फे युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र, भरती प्रक्रियेसाठी खासगी एजन्सी नियुक्‍ती झाल्यानंतरच मेगाभरतीला सुरुवात होईल, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

हेही नक्‍की वाचा : अवकाळीच्या मदतीपासून बळीराजा दूरच ! नऊशे कोटींचे वाटप नाहीच 

अडीच महिन्यांत मेगाभरतीला सुरवात होणार

महापरीक्षा पोर्टल बंद केल्यानंतर आता महाआयटीच्या नियंत्रणात खासगी एजन्सीद्वारे मेगाभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. पारदर्शक भरतीसाठी आयटी कंपन्यांमधील पदांची भरती करणाऱ्या सक्षम अशा संस्थेची नियुक्‍ती केली जाईल, असे महाआयटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, शासनाच्या आठ विभागांसाठी महापरीक्षा पोर्टलकडे नोंदणी केलेल्या 34 लाख 83 हजार विद्यार्थ्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाला सुपूर्द केला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मेगाभरतीत आता आरोग्य, शिक्षण, महसूल, गृह, कृषी, पशुसंवर्धन विभागांमधील पदांची वाढ झाली आहे. वर्ग- एक व वर्ग- दोनच्या अधिकाऱ्यांची भरती एमपीएससीमार्फत तर वर्ग- तीन व चारच्या पदांची भरती खासगी एजन्सीद्वारे भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अडीच महिन्यांत मेगाभरतीला सुरवात होणार असून दिवाळीपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे नियोजन आहे. 

हेही नक्‍की वाचा : अर्रर्र ! वसुलीसाठी न आलेल्या कर्मचाऱ्यांचा थांबविला पगार 

ठळक बाबी... 

  • महाआयटीतर्फे खासगी एजन्सी नियुक्‍तीसह भरती प्रक्रियेचे झाले नियोजन 
  • महापरीक्षा पोर्टलकडील विद्यार्थ्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाला देण्याची तयारी पूर्ण 
  • भरती प्रक्रिया करणाऱ्या खासगी एजन्सीची क्षमता अन्‌ तांत्रिक समितीसाठी तज्ज्ञांची समिती 
  • एकूण रिक्‍त पदांच्या 50 टक्‍के जागा भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय 
  • मेगाभरतीनंतर राज्य सरकारला तिजोरीतून द्यावे लागणार दरवर्षी दहा हजार कोटी 


हेही नक्‍की वाचा : नापासांची पंचाईत ! निकालानंतरही मिळेना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी