विजयपूरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने शेती, व्यापार व पर्यटनाला मिळेल चालना 

vimantal.jpg
vimantal.jpg

महूद(सोलापूर)ः विजयपूर या ठिकाणी नुकतेच आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर झाले असून या आंतरराष्ट्रीय विमानतळामूळे जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, अक्कलकोट या तालुक्‍याच्या विकासाला गती येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतीमाल निर्यात, व्यापार व पर्यटन वाढीला त्यामुळे चालना मिळणार आहे. 

विजयपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी पूर्ण झाली असून पहिल्या टप्प्यातील 95 कोटी कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. 2022 पर्यंत हे विमानतळ पूर्ण होण्यासाठी कालमर्यादा देण्यात आले आहे. यासाठी कर्नाटक शासनाने 220 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सन 2009 साली विजयपूर शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर मदभावी आणि बराणपुर या गावाच्या हद्दीतील 727 एकर जमीन हस्तांतरण करण्यात आले आहे. या एअरपोर्टमुळे दुबई, मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, तिरुपती, चेन्नई या देशांतर्गत व परदेशातून विमानसेवा मिळणार आहे. 

विजयपूर हे शहर सोलापूर, सांगोला, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा या शहरापासून नव्वद ते शंभर किलोमीटर अंतरावर आहे. या शहरांपासून विजयपूरला जोडणाऱ्या सर्व महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. विजयपूर हे शहर दोन ते अडीच तासाच्या अंतरावर आले आहे. या भागातील व्यापारी, सैन्य दलातील जवान, भाविक, पर्यटक यांच्यासह अनेक लोकांना मुंबई, दिल्ली व परदेशात जाण्यासाठी पुणे किंवा मुंबई या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जावे लागते. ते अंतर अडीचशे ते चारशे किलोमीटर असून त्यापेक्षा विजयपूर विमानतळ हे कमी वेळात पोहोचण्याच्या अंतरावर असेल. 
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी प्रचंड संख्येने भाविक येत-जात असतात. या भाविकांची सोय या विमानतळामुळे होणार आहे. तसेच सांगोला, पंढरपूर,मंगळवेढा, सोलापूर याठिकाणी असणाऱ्या द्राक्षे, डाळिंब, केळी, बेदाणे, साखर यासारख्या शेतमालासोबत इतर शेती प्रक्रिया वरील उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उपयोग होईल. या सेवेमुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ होऊ शकेल. त्याच बरोबर या जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक गड किल्ले प्राचीन वस्तू पाहण्यासाठी देश व विदेशातील पर्यटक या भागाला भेटी देऊ शकतील. या भागातील पर्यटन व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक विकासाच्या गोष्टींचा फायदा सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांना होणार आहे. 

विमानतळ शेती विकासासाठी उपयुक्त 
विजयपूर विमानतळाची उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे विमानतळ शेतीमाल निर्यातीसाटी व देशांतर्गत शेतमाल वाहतूकीसाठी उपयुक्त ठरणार आहे. 
- जगदीश बाबर, राज्य प्रवक्ते, स्वाभिमान संघटना, सांगोला

संपादनः प्रकाश सनपूरकर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com