महामार्गाच्या संपादीत जागेतील दसूर जि.प.शाळा वाचवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक

दिनेश माने- देशमुख
Tuesday, 27 October 2020

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी ही 24 विद्यार्थी पट असणारी इयत्ता 1 ते 4 ची प्राथमिक शाळा असून राष्ट्रीय महामार्गात बाधित झालेली आहे. सदर शाळेची बांधकाम रक्कम व जागेची रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्या नावे काही महिन्यांपूर्वी जमा करण्यात आली आहे. परंतु जिल्हा परिषद पातळीवरून शाळेच्या नवीन इमारतीसाठी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची जमीन खरेदी करुन शाळा बांधकाम करण्यासंदर्भात प्रक्रिया पार पडलेली दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर नवीन शाळेच्या बांधकामासाठी जोपर्यंत प्रशासनाकडून जागेची उपलब्धता होत नाही तोपर्यंत आहे ती जुनी शाळा पाडू न देण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत दसुर यांनी निर्णय घेतला आहे, अशीच भूमिका तालुक्‍यातील इतर धर्मपुरी व जाधववाडी येथील बाधित शाळेच्या व्यवस्थापन समितीने घेतला असल्याचे ही गणेश सावंत यांनी यावेळी सांगितले. 

बोंडले(सोलापूर)ः आळंदी-पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग क्र.965 हा माळशिरस तालुक्‍यातून जात असताना याच्या चौपदरीकरणासाठी मौजे दसूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी या शाळेचे क्षेत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने संपादित करण्यात आले आहे.यामुळे रस्त्याच्या कामाकरीता संपादित शाळेच्या नवीन जागा खरेदीचा व बांधकामाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत पूर्वीची इमारत पाडू न देण्यासाठी ग्रामस्थ व पालकांनी आंदोलन व रास्तारोकोचा इशारा दिला आहे.

या बाबतचा ठराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी च्या शाळा व्यवस्थापन समितीने आणि दसुर ग्रामपंचायतने केला असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश सावंत यांनी दिली आहे. 

हेही वाचाः कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर प्रभाग 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी ही 24 विद्यार्थी पट असणारी इयत्ता 1 ते 4 ची प्राथमिक शाळा असून राष्ट्रीय महामार्गात बाधित झालेली आहे. सदर शाळेची बांधकाम रक्कम व जागेची रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्या नावे काही महिन्यांपूर्वी जमा करण्यात आली आहे. परंतु जिल्हा परिषद पातळीवरून शाळेच्या नवीन इमारतीसाठी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची जमीन खरेदी करुन शाळा बांधकाम करण्यासंदर्भात प्रक्रिया पार पडलेली दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर नवीन शाळेच्या बांधकामासाठी जोपर्यंत प्रशासनाकडून जागेची उपलब्धता होत नाही तोपर्यंत आहे ती जुनी शाळा पाडू न देण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत दसुर यांनी निर्णय घेतला आहे, अशीच भूमिका तालुक्‍यातील इतर धर्मपुरी व जाधववाडी येथील बाधित शाळेच्या व्यवस्थापन समितीने घेतला असल्याचे ही गणेश सावंत यांनी यावेळी सांगितले. 

हेही वाचा ः जो कारखाना लवकर तोड देईल त्यालाच ऊस देणार ! शेतकरी झाले सतर्क 

माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रीय महामार्गावरील बाधित झालेल्या शाळांच्या संदर्भात खा.रणजितसिंह निंबाळकर,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते यांच्या उपस्थित माळशिरस पंचायत समितीमध्ये बैठक संपन्न झाली होती.या बैठकीत जोपर्यंत शाळेची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत शाळेच्या इमारतीला धक्का लागू नये असा निर्णय घेण्यात आला आहे आणि पंचायत समितीने सुद्धा तसा ठराव जिल्हा परिषदेला पाठवण्यात आलेला आहे.अशीही माहिती सावंत यांनी दिली. 

जिल्हा परिषदेला काही देणेघेणे आहे की नाही ? 
जागा खरेदी आणि बांधकामाचा निर्णय लवकरात लवकर न झाल्यास गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणावर याचा गंभीर परिणाम होणार आहे.या दिरंगाई वरून ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणाच सोलापूर जिल्हा परिषदेला काही देणंघेणं नाही असे दिसते. 
- धनंजय सावंत.ग्रामस्थ दसुर. 

माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रीय महामार्गात बाधित जिल्हा परिषदेच्या शाळा: 
धर्मपुरी पट-220,

जाधव वाडी पट -30,

सावंतवाडी दसुर पट -24 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers are aggressive to save Dasur ZP school in the modified area of ​​the highway