rupabhavani mandir.jpg
rupabhavani mandir.jpg

नवरात्रोत्सवात रूपा भवानी मंदिर दर्शनासाठी उघडा, अन्यथा आंदोलन ! वंचित बहुजन आघाडीने दिला इशारा

Published on

सोलापूरः नवरात्राच्या काळामध्ये शहरातील रुपाभवानी मंदिर भाविकासाठी खुले करावे या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. 
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी ही मागणी केली आहे. 

शासनाने अनलॉकमध्ये बार, हॉटेल व रेस्टॉरंट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुर्वी भाजी मंडी, व्यापार पेठ व दारु विक्रीसाठी देखील शासनाने निर्णय घेऊन राज्यात सर्व प्रकारचे नियम शिथिल केले. 

मात्र शिक्षण, मंदिरे, शाळा, महाविद्यालये, बुध्द विहार, चर्च, गुरुद्वारा असे समाजात चांगले विचार घडवणारी मुख्य केंद्रे मागील सहा महिन्यापासून बंद ठेवली आहेत. त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारची उदासिनता आली आहे. मंदिर व शाळा या पासून समाज वंचित राहत असल्याने समाजावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामधील काही अधिकारी कागदी घोडे नाचवून कागदावरच कोरोना रोखण्याचे काम करत आहेत. प्रत्यक्षात जनतेमध्ये जाऊन आजाराचे प्रबोधन केले असते तर आजची परिस्थिती बदलणे शक्‍य होते. शासनाकडून या बाबी होत नसल्याने कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला आहे. 
ता. 17 पासून नवरात्र महोत्सव सुरू होत आहे. शहरातील रुपा भवानी मातेचे मंदिर नवरात्राच्या काळात सुरू करावे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर व शासनाच्या नियमाचे पालन करून रुपा भवानी मातेचे मंदिर खुले करण्यात यावे. तसेच नंतरच्या काळात येणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नियमांच्या अटी व शर्ती पालन करून परवानगी देण्यात यावी. या प्रकरणी शासनाने मागणी मान्य न केल्यास सर्व भक्तांना घेऊन उग्र आंदोलन करण्याचा ईशारा श्री.चंदनशिवे यांनी दिला आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com