उद्योग विकास व स्थानिक रोजगार गरजांवर आधारित शिक्षणाचा प्रयोग कोणी केला? वाचा सविस्तर 

प्रकाश सनपूरकर
Tuesday, 11 August 2020

येथील संगमेश्‍वर महाविद्यालयास शैक्षणिक स्वायतत्ता अंतर्गत अभ्यासक्रम ठरवण्याचे व बदलाचे अधिकार दिले. नविन अभ्यासक्रम निवडीसाठी उद्योजक व व्यावसायिकांची हे समिती स्थापन करून त्यांच्या शिफारशी मागवण्यात आल्या. त्या आधारावर अभ्यासक्रम निश्‍चित केले. पूर्वी विद्यार्थ्यांना जर्मन व फ्रेंच शिकण्यासाठी पूणे येथे जावे लागत असे. आता सोलापूरमध्ये या भाषा शिकता येणार आहेत. चित्रकला महाविद्यालयाशिवाय बाहेर न मिळणारे चित्रकला, पोट्रेट पावडर शेडिंग, लॅंडस्केप, क्‍ले अँड टुल्स हे अभ्यासक्रम हौशी कलावंताना शिकता येणार आहेत. भविष्यात सेंद्रीय पिकांची बाजारपेठ वाढणार असल्याने सेंद्रीय शेतीचे शिक्षण उपलब्ध केले आहे. 

सोलापूरः सोलापूर परिसरातील स्थानिक उद्योग व विकास प्रक्रियेला पूरक असलेल्या रोजगारनिर्मितीचा विचार करत नव्या शिक्षणक्रमाची रचना करण्याचा प्रयोग येथील संगमेश्‍वर महाविद्यालयाने केला आहे. शैक्षणिक स्वायतत्तेच्या अंतर्गत विकासाच्या गरजा समजून घेत हा पहिला प्रयोग असेल. शहरात पहिल्यांदाच होणाऱ्या या प्रयोगाकडे शिक्षणक्षेत्राचे लक्ष वेधले गेले आहे. 

हेही वाचाः शहराच्या तुलनेत ग्रामीण मध्ये कोरोना सुसाट ! आज 285 पॉझिटिव्ह अन सात मृत्यू 

येथील संगमेश्‍वर महाविद्यालयास युजीसीच्या शैक्षणिक स्वायतत्ता अंतर्गत अभ्यासक्रम ठरवण्याचे व बदलाचे अधिकार दिले. नविन अभ्यासक्रम निवडीसाठी उद्योजक व व्यावसायिकांची हे समिती स्थापन करून त्यांच्या शिफारशी मागवण्यात आल्या. त्या आधारावर अभ्यासक्रम निश्‍चित केले. 
पूर्वी विद्यार्थ्यांना जर्मन व फ्रेंच शिकण्यासाठी पूणे येथे जावे लागत असे. आता सोलापूरमध्ये या भाषा शिकता येणार आहेत. चित्रकला महाविद्यालयाशिवाय बाहेर न मिळणारे चित्रकला, पोट्रेट पावडर शेडिंग, लॅंडस्केप, क्‍ले अँड टुल्स हे अभ्यासक्रम हौशी कलावंताना शिकता येणार आहेत. भविष्यात सेंद्रीय पिकांची बाजारपेठ वाढणार असल्याने सेंद्रीय शेतीचे शिक्षण उपलब्ध केले आहे. 

हेही वाचाः बससेवेचा निर्णय फसला पहिल्याच दिवशी चाळिस हजार रुपयांचा खर्च व उत्पन्न इतकेच 

स्पोकन इंग्लिश ही विद्यार्थ्यापासून व्यावसायिकांची गरज अभ्यासक्रमातून भागवली जाणार आहे. गारमेंट उद्योगाला पुरक म्हणून फॅशन डिझाईनींग, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन प्लॅन्ट ट्रेनिंग, 
केमिस्ट्री ऑफ फुड अँन्ड अडल्ट्रेशन, जिल्ह्यातील निर्यात उद्योगासाठी इम्पोर्ट- एक्‍स्पोर्ट मॅनेजमेंट, ग्रामीण मार्केटिंग, कॅपिटल मार्केटींग आदी अनेक अभ्यासक्रम स्थानिक उद्योग व व्यापाराच्या गरजा म्हणून उपलब्ध केल्या आहेत. हे अभ्यासक्रम केवळ पांरपारिक पध्दतीचे न होता ते स्थानिक रोजगार गरजा भागवणारे स्मार्ट कोर्सेस असावेत या पध्दतीने त्यांची रचना करण्यात आली आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने हाउस इलेक्‍ट्रीकल अप्लायंसेस रिपेअर, एलईडी बल्ब असेंब्ली, सायकॉलॉजीकल फर्स्ट एड (काउंसिलिंग), टॅली, जीएसटी, इंटेरिअर डिझाईनींग, हॉर्टीकल्चर गार्डनिंग, बोन्साय अशा प्रकारचे मुक्त शिक्षण घेण्याची संधी महाविद्यालयातील विद्यार्थी व व्यक्तींना असणार आहे. 
या शिवाय पदवी अभ्यासक्रमात देखील स्थानिक गरजानुसार या वर्षी पदवीच्या प्रथम वर्षात वीस टक्के बदल केले आहेत. पुढील वर्षात हे बदल वाढवले जाणार आहेत. 

उत्कृष्ट मनुष्यबळ निर्मितीची अपेक्षा 
महाविद्यालयास मिळालेल्या शैक्षणिक स्वायत्ततेच्या आधारावर विद्यार्थ्यांना व गरजू व्यक्तींना रोजगार व कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम उपलब्ध केले आहेत. डिजिटल पध्दतीने हे अभ्यासक्रम स्थानिक औद्योगिक व कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांची मते विचारात घेऊन केली गेली आहेत. त्यामुळे रोजगारनिर्मिती व उद्योगवाढीला चालना देणारे मनुष्यबळ यातून उपलब्ध व्हावे, असा प्रयत्न केला गेला आहे. 
- डॉ. शोभा राजमान्य, प्राचार्य, संगमेश्‍वर महाविद्यालय, सोलापूर. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who experimented with education based on industry development and local employment needs? Read detailed