....तर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ठेवीवर कर्ज काढून पीक कर्ज द्यावे, असे कोण म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

वेळेत पाऊस झाल्याने खरीप पिकाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पेरणीसाठी खते, बी-बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने त्यांना तत्काळ कर्जपुरवठा करण्याची गरज आहे. कोरोना संकटाने नागरिक, व्यावसायिक तसेच शेतकरी अडचणीत आले आहेत. लॉकडाउन काळात बाजारपेठ बंद असल्याने पालेभाजी, फळे यांना दर मिळाला नाही. उत्पादित शेतमाला फेकण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असून बी-बियाणे खरेदीसाठी पैसे नाहीत.

बार्शी(सोलापूर)ः सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने खरीपासाठी बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज दिले पाहीजे. बॅंकेकडे असलेल्या ठेवीवर कर्ज काढून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करावे अशी मागणी महा हाउसिंगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी केली आहे. 

हेही वाचाः धान्य गोदामातील घोटाळ्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी 

वेळेत पाऊस झाल्याने खरीप पिकाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पेरणीसाठी खते, बी-बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने त्यांना तत्काळ कर्जपुरवठा करण्याची गरज आहे. कोरोना संकटाने नागरिक, व्यावसायिक तसेच शेतकरी अडचणीत आले आहेत. लॉकडाउन काळात बाजारपेठ बंद असल्याने पालेभाजी, फळे यांना दर मिळाला नाही. उत्पादित शेतमाला फेकण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असून बी-बियाणे खरेदीसाठी पैसे नाहीत. शासनाने शेतकऱ्यांना किसान कार्ड दिले; पण एक रुपया खात्यात नाही. अर्थपुरवठा न झाल्यास पेरण्या होणार नाहीत. खरीप पिकापासून शेतकरी मुकेल अशी भीती निर्माण झालेली आहे. 

हेही वाचाः बोरामणी, पाकली, चिखली, अकलूजमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

जिल्हा बॅंकेचे प्रशासक आणि व्यवस्थापक श्री. कोथमिरे यांच्याशी कर्जपुरवठ्याबाबत संपर्क साधला असता बॅंकेचा एनपीए जास्त असल्याने कर्जपुरवठा करणे शक्‍य नसून नाबार्डकडे आर्थिक मदत मागितली असता नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा. जिल्हा बॅंकेस नाबार्डने पतपुरवठा करावा. शेतकऱ्यांना एक लाख रुपये पीकपाणी कर्ज उपलब्ध करावे. अन्य बॅंका व्यावसायिकांना कर्जपुरवठा करतात पण शेतकऱ्यांना करीत नाहीत. बॅंकेच्या ठेवीवर कर्ज काढून कर्जपुरवठा करावा, अशी मागणी प्रशासकाकडे केली आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री, पणनमंत्री यांना निवेदन देणार असल्याचे मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who said that district central bank should distibute crop loan by loaning of fixed deposit