सोलापुरात तब्बल दहा दिवस झाले सुरूय झेडपीसमोर महिलांचे आंदोलन

Women's Movement on ZP which has been running for ten days in Solapur
Women's Movement on ZP which has been running for ten days in Solapur

सोलापूर : नागरिकत्व कायदा (सीएए) व एनआरसीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर 1 फेब्रुवारीपासून दिल्लीच्या धर्तीवर महिलांचे प्रति शाहीनबाग आंदोलन सुरू असून आज यास दहा दिवस पूर्ण झाले आहे. या आंदोलनात महिला, लहान मुले व वृद्धाही सहभागी आहेत. थंडी व उन्हाची तमा न बाळगता आंदोलनात सहभागी महिला व मुलांसाठी शेकडो मदतीचे हात पुढे येत आहेत. 

दरम्यान, काही महिला सकाळ ते दुपारी तर काही महिला दुपारपासून रात्रीपर्यंत ठिय्या आंदोलन करत आहेत. लहान मुले शाळा सुटल्यावर आंदोलनस्थळी येत आहेत. या महिला आंदोलनात सहभागी होण्यासाठी घरातूनच जेवणाचा डबा घेऊन येत आहेत. दररोज सकाळ, दुपार, सायंकाळी जवळपास अडीच ते तीन हजार आंदोलक सहभागी होत आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली. 

संविधान वाचनाने आंदोलनाला सुरवात 
सकाळी 10 वाजता संविधान वाचनाने आंदोलनाला सुरवात होत असून, रात्री नऊच्या आत राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप केला जात आहे. आंदोलकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता पथक, संविधान बचाव कृती समिती, प्रचार समिती, मीडिया समिती तसेच आंदोलकांना ने-आण करण्यासाठी 250 स्वयंसेवक कार्यरत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 

अज्ञातांचे दातृत्व 
या आंदोलकांना सर्वधर्मीय, अज्ञात दात्यांकडून अल्पोपाहार, पाण्याच्या बाटल्या, सरबत, चहा, टेबल, खुर्च्या आदी मदत केली जात आहे. काही दात्यांकडून दुपारी व रात्री जेवणाचीही सोय केली जात आहे. काही वेळा आयोजकांकडून जेवणाची व अल्पोपाहाराची सोय केली जात आहे. 

ठळक तपशील... 
- शहरातील विविध भागांतून महिला आंदोलक पूनम गेटसमोर जमा होत आहेत 
- सकाळी 10 ते रात्री नऊपर्यंत ठिय्या आंदोलन करत आहेत 
- आंदोलनात महिलांसह लहान मुला - मुलींचाही मोठा सहभाग 
- जोपर्यंत नागरिकत्व कायदा मागे घेतला जाणार नाही हा निर्धार 
- हे बेमुदत आंदोलन कायदा मागे घेईपर्यंत सुरू ठेवणार असल्याचा आयोजकांचा निर्धार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com