'लॉकडाऊन दरम्यान जिल्हा परिषद शिक्षकांचे काम कौतुकास्पद'; सीईओही भारावले

Zilla Parishad Chief Executive Officer Dilip Swamy is overwhelmed to see that the work of Zilla Parishad teachers is commendable
Zilla Parishad Chief Executive Officer Dilip Swamy is overwhelmed to see that the work of Zilla Parishad teachers is commendable
Updated on

सोलापूर : 'शाळा बंद, शिक्षण सुरु' हा उपक्रम तुम्ही सुरु केलात, जिल्ह्यातील झेडपीच्या किती शिक्षकांनी किती पालकांची भेट घेतली. किती मुख्याध्यापकांनी पालकांची आणि विद्यार्थ्यांची भेट घेतली, असा प्रश्‍न जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी विचारला होता. हा प्रश्‍न ज्यांना विचारला ते होते गट शिक्षणाधिकारी. सीईओंच्या या प्रश्‍नाने गटशिक्षणाधिकारी निरुत्तर झाले. शिक्षकांचे काम पाहण्यासाठी जिल्ह्यात केंद्रस्तरीय शिक्षणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून शिक्षकांचे काम बोलल्याने सीईओ स्वामी भारावले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
लॉकडाऊन कालावधीत जिल्हा परिषदेतील अनेक शिक्षकांनी पदरमोड करुन खूप चांगले काम केले आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण, निबंध स्पर्धा घेतल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या शिक्षकांचे उपक्रम पाहून सीईओ स्वामी यांनी या शिक्षकांचे कौतुक केले आहे. जिल्ह्यातील केंद्र शाळांमध्ये झालेल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेला जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख व गटविकास अधिकारी आवर्जून उपस्थित राहिले. मोहोळ तालुक्‍यातील पोखरापूर केंद्रातील शिक्षण परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी आवर्जून भेट दिली.

हे ही वाचा : सांगोला, दक्षिणमधील लिंग गुणोत्तर कमी का? कारणांचा शोध घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना 
 
मुलांसाठी व्हिडीओच्या माध्यमातून शिक्षण देणारे सावंत दांपत्य, पेनूरमधील उपक्रमशील शिक्षक पवार यांच्यासह इतर शिक्षकांच्या कामाचे कौतुक सीईओ स्वामी यांनी केले. सीईओ स्वामी म्हणाले, शिक्षकांनी कोरोनाच्या आपत्तीतून बाहेर यावे. शिक्षकांनी त्यांच्या कामाला नोकरी समजून आपल्या कामाचा दर्जा कमी करु नये. आपल्या संस्कृतीत शिक्षकांचे महत्व अनन्य साधरण आहे. हे महत्व कधीही कमी होणार नाही. शिक्षकांनी आपल्या कामाशी निष्ठा ठेवून पुन्हा नव्या जोमाने कार्याला लागावे. जिल्ह्याची गुणवत्ता राज्यामध्ये प्रथम येण्यासाठी प्रयत्न करावेत. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना शाबासकी व कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई या तत्वानुसार येत्या काळात आपण काम करणार असल्याचेही सीईओ स्वामी यांनी सांगितले. 

उपक्रमशील शिक्षकांचा होणार ग्रुप 

सोलापूर जिल्ह्यात अनेक शिक्षक विविध उपक्रम राबवितात. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करतात. अशा उपक्रमशील शिक्षकांचा आपण एक ग्रुप तयार करणार असल्याची माहिती सीईओ स्वामी यांनी दिली. या ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांच्या चांगल्या उपक्रमांची अंमलबजावणी जिल्हाभर केली जाणार आहे. जगाच्या स्पर्धेत उतरेल असा विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत घडविण्याचा आपला संकल्प असल्याचेही सीईओ स्वामी यांनी सांगितले. 

संपादन : सुस्मिता वडतिले 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com