अबब ! गडहिंग्लजला जवारी मिरचीला 'इतका' उच्चांकी दर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज झालेल्या सौद्यात जवारी मिरचीचा दर एक हजारी पार झाला. प्रति किलोला 1020 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, यापुढे ही मिरची ग्राहकांना अधिकच झोंबणार आहे. आजचा दर हा बाजार समितीच्या इतिहासातील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. 

गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज झालेल्या सौद्यात जवारी मिरचीचा दर एक हजारी पार झाला. प्रति किलोला 1020 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, यापुढे ही मिरची ग्राहकांना अधिकच झोंबणार आहे. आजचा दर हा बाजार समितीच्या इतिहासातील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. 

आज मार्केट यार्ड परिसरातील अडत दुकानांमध्ये लाल मिरचीचा सौदा होता. काशिनाथ मोर्ती यांच्या अडत दुकानात सुळे (ता. आजरा) येथील उत्पादक शेतकरी सुमन इंद्रजित कोकीतकर यांनी मिरची सौद्याला लावली होती. व्यापारी जब्बार बागवान यांनी ही मिरची 1020 रुपये प्रति किलोने खरेदी केली. म्हणजेच जवारी मिरचीचा दर 1 लाख 2 हजार रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सौद्यावेळी व्यापारी राजन जाधव, कयुम बागवान, श्रीकांत यरटे, अरविंद आजरी, रोहित मांडेकर, शिवानंद मुसळे, भरत शहा, विश्‍वनाथ चोथे, सलीम पटेल, बी. एस. पाटील, संजय खोत, राजू खोत, लक्ष्मण पाटील, मुन्ना बागवान आदींसह बाजार समितीचे सौदा लिपिक समरजित खराडे उपस्थित होते. 

हेही वाचा - अबब...रेणुका हिच्या 3 वर्षात 13 सरकारी नोकऱ्या 

नगण्यप्रमाणात मिरचीचे उत्पादन

दरम्यान, यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. स्थानिक शेतकऱ्यांसह कर्नाटकातील संकेश्‍वर, नेर्ली परिसरातील उत्पादक विशेषत: जवारी मिरचीचे उत्पादन घेतात; परंतु मागणीच्या अगदी नगण्यप्रमाणात या मिरचीचे उत्पादन आहे. यामुळे प्रत्येक हंगामात ही मिरची भाव खात आहे. यंदा दरवर्षीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती असल्याने प्रत्येक सौद्यावेळी ही मिरची दराचा उच्चांक करीत आहे. अद्याप स्थानिक मिरचीची आवक सुरू असून, जानेवारीपासून ब्याडगी मिरचीची आवक सुरू होईल. त्या मिरचीचे दरही वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदा ग्राहकांना मिरची झोंबणार एवढे मात्र निश्‍चित. 

हेही वाचा - आजारी आजोबांचे नातवासाठी कायपण !; पतंगासाठी असाही प्रयत्न 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1020 Per KG Rate To Red Chili Mirchi In Gadhinglaj