esakal | बेळगावात '12 वी'चा निकाल 100 टक्के; 'सर्वच पास'चा निर्णय पथ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगावात '12 वी'चा निकाल 100 टक्के; 'सर्वच पास'चा निर्णय पथ्यावर

बेळगावात '12 वी'चा निकाल 100 टक्के; 'सर्वच पास'चा निर्णय पथ्यावर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बेळगाव : परिक्षा नसताना पास करण्याचा निर्णय अनेक महाविद्यालये व विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे. तसेच अनेक महाविद्यालयांसह बेळगाव जिल्ह्याचा (belgaum district) निकाल शंभर टक्के लागला आहे. जिल्ह्यातील २२,३८३ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परिक्षेसाठी अर्ज केला होता यामध्ये ३,१०५ विद्यार्थी रिपिटर्स होते. हे सर्वच विद्यार्थी बारावीच्या (12 th result) परीक्षेत पास झाले असून दहावी-अकरावी गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. त्यामुळे सर्रास विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत.

दरवर्षी निकालात मागे असणाऱ्या महाविद्यालयांचा निकालही सुधारला असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांचे निकाल ८० टक्‍क्‍यांहून अधिक लागला आहे. तसेच परीक्षा नसताना पास करण्यात आल्याने एक-दोन विषय राहिलेल्या रिपिटर्स विद्यार्थ्यांनाही मोठा लाभ झाला आहे. तसेच त्यांच्या गुणांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना वाढलेल्या गुणांचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचा: 'राज्य सरकारने किती ऑक्सीजन प्लांट उभे केले हे जाहीर करावे'

निकालाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याची माहिती पदवीपूर्व शिक्षण खात्याने दिली. निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते. मात्र यावेळी निकालाच्या दिवशीही विद्यार्थी बिनधास्त असल्याचे पहावयास मिळत होते. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. अनेक विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये पास झाले आहेत.

जिल्ह्याचा बारावीचा निकाल

 • एकूण विद्यार्थी २२,३८३

 • फ्रेश विद्यार्थी १९,२७८

 • रिपिटर्स ३,१०५

  विविध विभागांचा निकाल

 • कला शाखा ८२२९

 • वाणिज्य शाखा ८०३१

 • विज्ञान शाखा ६१२३

  एकूण विद्यार्थी

 • विद्यार्थी ११,४४६

 • विद्यार्थ्यांनी १०,९३७

 • शहरातील विद्यार्थी १६,७१२

 • ग्रामीण भागातील विद्यार्थी ५,६७१

हेही वाचा: राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार

"परीक्षेची तयारी केली होती. मात्र परीक्षा रद्द करत पास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे किती गुण मिळतील, याबाबत मनात सांक्षकता होती. मात्र अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले आहेत."

- आरती पाटील, ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर

loading image