esakal | यल्लम्मा डोंगरावर जमणार तब्बल 15 लाख भाविक
sakal

बोलून बातमी शोधा

15 lakh devotees will gather on Yallamma hill nipani

आजच्या डिजिटल युगातही आपले वेगळेपण जपणाऱ्या यल्लम्मा देवी यात्रेला रविवारपासून (ता. 9) सुरवात झाली. महाराष्ट्रासह चिक्कोडी, रायबाग, अथणी भागातील लाखो भाविक यल्लम्मा डोंगरावर दाखल झाले आहेत. मुनवळ्ळीपासून सौंदत्ती डोंगरापर्यंत सध्या सजविलेल्या बैलगाड्यांच्या रांगा दिसत आहेत. यात्राकाळात सुमारे 15 लाखांहून अधिक भाविक देवीचे दर्शन घेण्याचा अंदाज आहे. 

यल्लम्मा डोंगरावर जमणार तब्बल 15 लाख भाविक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - आजच्या डिजिटल युगातही आपले वेगळेपण जपणाऱ्या यल्लम्मा देवी यात्रेला रविवारपासून (ता. 9) सुरवात झाली. महाराष्ट्रासह चिक्कोडी, रायबाग, अथणी भागातील लाखो भाविक यल्लम्मा डोंगरावर दाखल झाले आहेत. मुनवळ्ळीपासून सौंदत्ती डोंगरापर्यंत सध्या सजविलेल्या बैलगाड्यांच्या रांगा दिसत आहेत. यात्राकाळात सुमारे 15 लाखांहून अधिक भाविक देवीचे दर्शन घेण्याचा अंदाज आहे. 

हे पण वाचा -  पोलिस अधिकार्‍यानेच दिल्या सात जागी धडका; मृतदेहासह नातेवाईक पोलिसाच्या घरी... 

पावसाळ्यात चिक्‍कोडी भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक शेतकऱ्यांना आपली पिके गमवावी लागली. त्यामुळे, त्याचा यात्रेवर प्रभाव पडेल असा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरला असून भाविक लाखोच्या संख्येने डोंगरावर दाखल झाले आहेत. ग्रामीण भागातून येणारे भाविक दोन ते चार दिवस डोंगरावरच वास्तव्य करुन देवीच्या नामस्मरणासह भंडाऱ्याची उधळण करीत देवीची पडली भरुन नंतर घराकडे प्रस्थान करतात. दरवर्षी ही परंपरा जपली जाते. यंदा भाविकांचा आकडा 15 लाख पार करेल, असा अंदाज आहे. त्यासाठी आवश्‍यक त्या मुलभूत सुविधा मंदिर प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिल्या आहेत. 
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकासह रोण, गदग, नरगुंद, हुबळी-धारवाडमधून अतिरिक्त बसेसची सोय केली आहे. तसेच गदग व नरगुंदकडून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था जमदग्नी देवस्थानासमोर केली आहे. कचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक तीन दुकानांच्यामध्ये एक डस्टबीन ठेवला आहे. यासह 15 कचरा उचल करणारी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आरोग्य खात्याकडून ठिकठिकाणी तात्पुरते दवाखाने सुरू केले आहेत. मोक्‍याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे आणि ध्वनीक्षेपक बसविले असून त्यावर आवश्‍यक ती माहिती दिली जात आहे. 

हे पण वाचा - कुणाची आई गेली तर कुणाचा बाप, आता सांत्वन करायचे तरी कुणाचे? 

महाराष्ट्रीय वाहनांना करात सूट 
सौंदत्ती रेणुका देवी यात्रेसह चिंचली मायाक्का देवी यात्रेला महाराष्ट्रातून अधिक संख्येने भाविक येतात. महाराष्ट्रातून वाहनाने येणाऱ्या भाविकांना कर्नाटक सरकारने वाहन करात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 8 ते 12 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवासी वाहनांना ही सूट लागू असणार आहे, अशी माहिती कागवाडचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) दिली आहे. 

मागील वर्षी यात्राकाळात पाण्याची तीव्र टंचाई भासली होती. त्यामुळे, यंदा पाण्याचे अतिरिक्‍त टॅंकर उपलब्ध करून दिले आहेत. यासह जमदग्नी मंदिर, रिंग रोड, खासगी वाहन पार्किंग स्थळांसह मोक्‍याच्या ठिकाणी 200 हून अधिक पाण्याचे नळ बसविले आहेत. यंदा पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. 

रवी कोटारगस्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी, रेणुका देवी मंदिर 

loading image