सोशल मैत्री अंगलट : मोबाईल भेटीसाठी मोजले 22 लाख

22 lakhs for mobile visits
22 lakhs for mobile visits

नगर : सोशल मीडियात घडणाऱ्या घटनांमुळे समाजात नव्याच समस्या उभ्या राहत आहेत. त्या आभासी जगातील मैत्रीला भुलून अनेकांचे बळी जात आहेत. विशेषतः आर्थिक फसवणुकीचे गुन्हा वाढत आहेत. किरकोळ गोष्टींच्या मोहापायी हे सर्व घडत आहे. जामखेड तालुक्‍यातील एका महिलेबाबत हेच घडले. तिला जेव्हा त्या आभासी जगाविषयी कळले तेव्हा तिची मोठी आर्थिक फसवणूक झाली होती. 


सकाळने या सायबर क्राईमविषयी सातत्याने प्रबोधन केले. तरीही लोक त्यातील भुलभुलैयाला बळी पडत आहेत. केवळ एका मोबाईल आणि लॅपटॉपसाठी तब्बल 22 लाख मोजावे लागले. 

एफबीवर फ्रेंड रिक्वेस्ट 
"फेसबुक'वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून नंतर भेटवस्तूंचे आमिष दाखवून जामखेडमधील महिलेला 21 लाख 41 हजार 275 रुपयांचा गंडा घालण्यात आला. याबाबत संबंधित महिलेने नगरच्या सायबर क्राइम पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विदेशी डॉक्‍टर व दिल्लीतील महिला कस्टम अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोबाईलचे आमिष 
इंग्लंडमधील डॉ. मार्क हॅरिल्युके याने संबंधित महिलेला "फेसबुक'वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. नंतर फोन करून तिचा विश्‍वास संपादन केला. मोबाईलवर चॅटिंग केले. त्या वेळी त्याने महिलेच्या मुलांना लॅपटॉप व मोबाईल पाठविल्याचे सांगितले. 

पैसे भरण्यासाठी धमकी 
या भेटवस्तूंसाठी महिलेला वेगवेगळे चार्जेस भरावे लागतील, असे दिल्लीतील महिला कस्टम अधिकाऱ्याने दूरध्वनीवर सांगितले. बॅंक अकाउंटचे वेगवेगळे क्रमांक दिले. त्यात पैसे न भरल्यास तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. डॉ. मॉर्क हॅरिल्युके यानेही दूरध्वनीवर तेच सांगितले. त्यानुसार महिलेने पैसे भरले. या दोघांनी संगनमताने महिलेची 21 लाख 41 हजार 275 रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

यापूर्वीही एका तरूणाला मुंबईतील मुलीने असेच फसवले होते. फेसबुकवरील चॅटिंगला बळी पडून काहीजणींचा दिल तुटल्याच्याही घटना ताज्या आहेत. तरीही त्या आभासी दुनियेचा मोह काही सुटता सुटत नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com