
Sangli Crime News
esakal
Sangli Jat Panchayat Samiti : जत पंचायत समितीतील शाखा अभियंत्याचा मृतदेह आज कृष्णा नदीवरील नव्या पुलाजवळ आढळल्याने खळबळ उडाली. अवधूत अशोक वडार (वय २७, रा. इस्लामपूर) असे त्याचे नाव आहे. त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीत समोर आले. दरम्यान, वडार याच्या नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात दाखल होत आरोप केला. एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहायक व पंचायत समितीतील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने शासकीय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेतला.