सुवर्ण सिद्धेश्‍वरसाठी लागणार 30 कोटी (vedio) 

प्रशांत देशपांडे 
Friday, 3 January 2020

  • चार वर्षांत 30 टक्‍केच काम 
  • दोन हजार किलो चांदी अन्‌ 50 किलो सोन्याची गरज 
  • सुवर्ण सिद्धेश्‍वरसाठी एकूण 30 कोटींचा खर्च अपेक्षित 
  • आतापर्यंत 473 किलो 500 ग्रॅम चांदी व एक किलो 132 ग्रॅम सोने प्राप्त 
  • सुवर्ण सिद्धेश्‍वरसाठी 500 किलो चांदीचा वापर केला 

सोलापूर : मागील चार वर्षांत सुवर्ण सिद्धेश्‍वरचे काम 30 टक्केच झाले असून उर्वरित काम केव्हा पूर्ण होणार, हे अद्याप अस्पष्टच आहे. सुवर्ण सिद्धेश्‍वरसाठी एकूण 30 कोटींचा खर्च अपेक्षित असून आतापर्यंत 473 किलो 500 ग्रॅम चांदी व एक किलो 132 ग्रॅम सोने देणगी स्वरूपात प्राप्त झाले आहे. मात्र, या कामासाठी आणखी दोन हजार किलो चांदीची तर 50 किलो सोन्याची आवश्‍यकता असल्याची माहिती सिद्धेश्‍वर मंदिर समितीच्या सूत्रांनी दिली. 

हेही वाचा अवर्जुन : भक्त निवास : क्षमता 90 जणांची, बुकींग 60 जणांचे 
मंदिरातील गाभारा आणि गाभाऱ्याबाहेरील सभा मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या यात्रेनिमित्त त्याच्यावर लेप देण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता सभा मंडपासमोरच्या दर्शनी भागाचे काम सुरू आहे. सुवर्ण सिद्धेश्‍वरसाठी 500 किलो चांदीचा वापर केला आहे. सुवर्ण सिद्धेश्‍वरसाठी काशी पीठाचे जगदगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, आचार्य गिरीराज किशोर व्यास, होटगी मठाच्या वतीने डॉ. चंद्रशेखर महास्वामी, औसा मठाच्या वतीने पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथमहाराज औसेकर यांच्यासह अन्य व्यक्तींसह महाराष्ट्र, कार्नाटकातील लाखो भक्तांनी चांदी, सोने आणि पैसे दान केले आहेत. 

हेही वाचा अवर्जुन : नववर्षानिमीत्त नवयुवकांचा वंचित मुलांसाठी डोनेशन बॉक्‍स 
ध्यान मंदिरात सिद्धेश्‍वरांचे लावणार तैलचित्र 
सिद्धेश्‍वर मंदिरात भक्तांना ध्यान करता यावे म्हणून मुख्य सभा मंडपाच्या तळघरात त्यासाठी प्रशस्त ध्यान मंदिर तयार करण्यात आले आहे. तेथे मंदिरात सिद्धेश्‍वर महाराजांचे मोठे तैलचित्र बसविण्यात येणार आहे. ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने सिद्धेश्‍वर तलाव भरला आहे. त्यामुळे आता ध्यान मंदिराचे काम सुरू झाले असून लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. 

30 टक्के काम झाले असून उर्वरित काम सुरू आहे.

सुवर्ण सिद्धेश्‍वर अंतर्गत आतापर्यंत 30 टक्के काम झाले असून उर्वरित काम सुरू आहे. काम पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागेल. सुवर्ण सिद्धेश्‍वरसाठी आणखी सोने व चांदीची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर ध्यान मंदिरचे काम रखडले होते. मात्र, आता तलावात पाणी आल्याने हे काम मार्गी लागले आहे. 
- धर्मराज काडादी, अध्यक्ष, सिद्धेश्‍वर देवस्थान पंच कमिटी, सोलापूर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 crores will be required for Golden Siddheshwar