Koyna Dam : सांगलीसाठी कोयना धरणातून 3300 क्युसेक पाण्याचा विसर्ग; धरणात किती आहे पाणीसाठा?

कोयना धरणात आजच्या घडीला ४२.९३ टीएमसी साठा असून, उपयुक्त साठा ३७.८१ टीएमसी आहे.
Koyna Dam
Koyna Damesakal
Summary

दहा दिवसांत पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली असून, आज रिव्हर स्लाईस गेटमधून पुन्हा ३०० क्युसेक विसर्ग वाढवला.

पाटण : सांगली पाटबंधारे विभागाकडून (Sangli Irrigation Department) सिंचनाची मागणी वाढल्यामुळे सकाळी नऊ वाजता नदी विमोचकाद्वारे (रिव्हर स्लाईस गेट) होणारा पाण्याचा ९०० क्युसेक विसर्ग वाढवून १२०० क्युसेक केला आहे. कोयना धरणाच्या (Koyna Dam) पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून, त्याद्वारे २१०० क्युसेक विसर्ग सुरू असून, कोयना नदीपात्रात एकूण तीन हजार ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

कोयना धरणात आजच्या घडीला ४२.९३ टीएमसी साठा असून, उपयुक्त साठा ३७.८१ टीएमसी आहे. उन्हाची तीव्रता गेल्या दोन महिन्यांपासून वाढत असून, नऊ मार्चला सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे दुपारी चार वाजता कोयना धरणाचे नदी विमोचक (रिव्हर स्लईस गेट) उघडून कोयना नदीमध्ये ५०० क्युसेक विसर्ग सोडला होता.

Koyna Dam
Sadabhau Khot : 'मंत्रिपद गेलं, गाडीवालं पन गेलं, गाड्या बी गेल्या, आता मला च्याबी प्याला कोण बोलवत नाही'

पुन्हा सहा एप्रिलला सकाळी नऊ वाजता रिव्हर स्लाईस गेटमधून ४०० क्युसेक वाढवून ९०० क्युसेक केला होता; मात्र या दहा दिवसांत पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली असून, आज रिव्हर स्लाईस गेटमधून पुन्हा ३०० क्युसेक विसर्ग वाढवला असून, रिव्हर स्लईस गेटमधून एक हजार २०० क्युसेक व पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक असा एकूण तीन हजार ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com