

Leopard Cub Rescued in Kapari After 36-Hour Separation; Cane Harvesting Halts
Sakal
शिराळा : कापरी (ता. शिराळा) येथे दहा दिवसांपासून वारंवार दिसणारा बिबट्या व सापडलेल्या त्याच्या दोन बछड्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. ऊसतोडी रखडल्या आहेत. वन विभागाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केली. दरम्यान, ३६ तास माय-लेकरांची ताटातूट झाल्याने त्याची भेट घडवून आणण्यासाठी वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.