55 वर्षांत सोलापूर महापालिकेत "इतके' महापौर 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

तीन महापौर बिनविरोध 
महापालिकेच्या इतिहासात फक्त तीन महापौर बिनविरोध निवडले गेले. मागासवर्गीय प्रवर्गातील पहिले महापौर होण्याचा मान दलितमित्र भीमराव जाधव गुरुजी (1974-75) यांना मिळाला. मुस्लिम समाजाचा पहिला व्यक्ती महापौरपदासाठी उभा असल्याने विरोधकांनी उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे युन्नूस शेख (1975-76) यांचीही बिनविरोध निवड झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून अनुसूचित जाती प्रवर्गातील मुरलीधर पात्रे (1990-91) यांची बिनविरोध निवड झाली. 

सोलापूर ः महापालिका स्थापनेनंतरच्या 55 वर्षांच्या कालखंडात आतापर्यंत 36 महापौर व 35 उपमहापौर झाले. महापौरपदावर तीन जणांची बिनविरोध निवड झाली. पहिले उपमहापौर एन. एम. वडवान हे सर्वाधिक कालावधीसाठी (1964-70) पदावर होते. लोकप्रतिनिधींकडून व्यवस्थित कारभार होत नसल्याने दोन वेळेला प्रशासक नियुक्त झाले. या कालावधीत सहा प्रशासकांनी कामकाज पाहिले. उद्या (बुधवारी) नव्या महापौर व उपमहापौरांची निवड होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आतापर्यंतचा आढावा. 

सहा प्रशासकांनी पाहिले काम

1 ऑगस्ट 1852 रोजी स्थापन झालेल्या सोलापूर नगरपालिकेचे 1 मे 1964 मध्ये महापालिकेत रूपांतर झाले. शेवटचे नगराध्यक्ष पारसमल जोशी हेच पहिले महापौर झाले. प्रा. डॉ. पुरणचंद्र पुंजाल (1985-86) आणि किशोर देशपांडे (1986-87) यांची पुलोदच्या कालावधीत महापौरपदी निवड झाली. संजय हेमगड्डी (1999-2002) हे कॉंग्रेसपुरस्कृत अपक्ष उमेदवार होते. लोकप्रतिनिधींकडून महापालिकेचा कारभार व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी तत्कालीन आयुक्तांनी शासनाकडे केल्या. त्यामुळे एक जून 1967 ते 22 जून 1969 आणि पुन्हा सहा फेब्रुवारी 1981 ते 12 मे 1985 या कालावधीत प्रशासकीय कारकीर्द होती. या कालावधीत एम. जी. सप्रे, डी. डी. रणदिवे, एस. के. जांबवडेकर, व्ही. के. कोल्हटकर, रमानाथ झा आणि ए. के. नंदकुमार या आयुक्तांनी प्रशासक म्हणून काम पाहिले. 

हेही वाचा... एक रुपयाचा कडीपत्ता हे झाले बेपत्ता 

1964 पासूनचे महापौर, उपमहापौर 
महापौर : पारसमल जोशी, तात्यासाहेब घोंगडे, इरप्पा बोल्ली, गणेशप्पा बाळी, विश्‍वनाथ बनशेट्टी, राजाराम बुर्गुल, बाबूराव चाकोते, भीमराव जाधव, युन्नूस शेख, भालचंद्र अलकुंटे, विश्‍वनाथ भोगडे, सिद्राम आडम, भगवान चव्हाण, नारायणदास राठी, प्रा. पुरणचंद्र पुंजाल, किशोर देशपांडे, बंडप्पा मुनाळे, महादेव महिंद्रकर, धर्मण्णा सादूल, मुरलीधर पात्रे, उमरखान बेरिया, विश्‍वनाथ चाकोते, मनोहर सपाटे, महेश कोठे, सुभाष पाटणकर, ख्वाजादाऊद नालबंद, शेवंताबाई पवार, जनार्दन कारमपुरी, संजय हेमगड्डी, नलिनी चंदेले, विठ्ठल जाधव, अरुणा वाकसे, आरिफ शेख, अलका राठोड, सुशीला आबुटे व विद्यमान शोभा बनशेट्टी. 

हे आधी वाचा... शिर्डी विमानतळात घुसले अतिरेकी 

उपमहापौर : एन. एम. वडवान, यल्लप्पा जेनुरे, माधवराव कोंतम, फजलेअहमद आडते, ना. व्यं. पिट्टा, ल. आ. साठे, दीनानाथ एरम, प्रा. नसीम पठाण, म. ति. होसमनी, ह. ना. आसादे, त. म. गंभिरे, इस्माईल अल्लोळी, संगप्पा केंगनाळकर, लालसिंग रजपूत, नारायण कोनापुरे, बाळासाहेब घोंगडे, हबीब सय्यद, अभिमन्यू भोसले, वाय. एस. गायकवाड, सुषमाताई घाडगे, इस्माईल बागवान, फातिमा शेख, अरविंद काकडे, माणिकसिंग मैनावाले, प्रमोद गायकवाड, महानंदा भोसले, सुमनताई मुदलियार, अप्पाशा म्हेत्रे, पद्माकर काळे, दिलीप कोल्हे, राजेंद्र कलंत्री, विष्णू निकंबे, हारून सय्यद, प्रवीण डोंगरे व विद्यमान शशिकला बत्तुल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 36 mayour in 55 yrs in solapur municipal corporation