सांगलीत 546 कोरोनामुक्त; नवे 277 रुग्ण, दहा जणांना मृत्यू

शैलेश पेटकर
Monday, 12 October 2020

सांगली : जिल्ह्यात आज 277 नवे कोरोना रुग्ण आढळले, तर जवळपास दुपटीने म्हणजे 546 जण कोरोनामुक्त झाले.

सांगली : जिल्ह्यात आज 277 नवे कोरोना रुग्ण आढळले, तर जवळपास दुपटीने म्हणजे 546 जण कोरोनामुक्त झाले. नव्या रुग्णांची गेल्या काही दिवसांत संख्या कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 41 हजार 171 इतकी झाली आहे. आज दिवसभरात दहा जणांना मृत्यू झाला असून, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. 

दिवसभरात आरटीपीसीआरच्या 691 चाचण्या झाल्या. त्यात 154 जणांना बाधा झाली, तर अँटिजेनच्या 1643 तपासण्या झाल्या आहे. 131 जण पॉझिटिव्ह आढळले. आटपाडी तालुक्‍यात 24, जत तालुक्‍यात 9, कडेगावमध्ये 14, कवठेमहांकाळमध्ये 11, खानापूरमध्ये 26, मिरज तालुक्‍यात 17, पलूस तालुक्‍यात 21, शिराळा तालुक्‍यात 22, तासगाव तालुक्‍यात 19, तर वाळवा तालुक्‍यात 32 नवे रुग्ण आढळले. महानगरपालिका क्षेत्रात 82 पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यात सांगली-कुपवाडमधील 50, तर मिरज शहरातील 32 जणांचा समावेश आहे. 

आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्‍यांतील प्रत्येकी एकाचा; तर कडेगाव तालुक्‍यातील दोघांचा मृत्यू झाला. वाळवा तालुक्‍यात तिघांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत नवे रुग्ण आणि मृत्यू संख्या घटत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोविड सेंटरमधील बेडही आता रिकामे होत आहेत. गृह अलगीकरणात जिल्ह्यात तीन हजार 62 रुग्ण आहेत. जिल्ह्यात चार हजार 268 रुग्ण सध्या कोविड उपचाराखाली आहेत. 

जिल्ह्यातील स्थिती 

  • उपचाराखालील रुग्ण- 4268 
  • पॉझिटिव्हपैकी चिंताजनक - 620 
  • ग्रामीण भागातील रुग्ण- 19646 
  • शहरी भागातील रुग्ण- 6078 
  • महापालिका क्षेत्रातील रुग्ण- 15447 
  • आजअखेरचे मृत्यू- 1520 

संपादन : युवराज यादव


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: 546 corona free in Sangli; New 277 patients, 10 deaths