25 वर्षे रखडलेला 'हा' रेल्वेमार्ग आता प्रत्यक्षात उतरणार! मार्गासाठी 600 कोटींच्या निविदा प्रसिद्ध, 'या' बड्या नेत्यांचा पाठपुरावा

Baramati News: येत्या दोन वर्षात हा रेल्वे मार्ग उभारण्याचे उद्दिष्ट रेल्वेने नजरेसमोर ठेवून काम सुरु केले आहे.
Baramati-Phaltan-Lonand Railway
Baramati-Phaltan-Lonand Railwayesakal
Summary

बारामती-फलटण-लोणंद या रेल्वेमार्गाला रेल्वे विभागाने (Railway Division) सन 1997-1998 च्या रेल्वे अर्थसंकल्पातच मंजुरी दिली होती.

बारामती : तब्बल 25 वर्षे रखडलेला बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्ग (Baramati-Phaltan-Lonand Railway) आता प्रत्यक्षात उतरणार आहे. फलटण- लोणंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून आता बारामती-फलटण रेल्वे मार्गाचे 78 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.

येत्या दोन वर्षात हा रेल्वे मार्ग उभारण्याचे उद्दिष्ट रेल्वेने नजरेसमोर ठेवून काम सुरु केले आहे. या रेल्वे मार्गासाठी प्रत्येकी 300 कोटी रुपयांच्या दोन अशा 600 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिध्द झाल्या असून पंधरवड्यात हे काम पूर्ण करण्यासाठी एजन्सी अंतिम होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

Baramati-Phaltan-Lonand Railway
'मी महादेवराव महाडिकांच्या तालमीत तयार झालोय, त्यांना योग्यवेळी प्रत्युत्तर देऊ'; कोणी दिलाय सतेज पाटलांना इशारा?

बारामती-फलटण-लोणंद या रेल्वेमार्गाला रेल्वे विभागाने (Railway Division) सन 1997-1998 च्या रेल्वे अर्थसंकल्पातच मंजुरी दिली होती. प्रत्यक्षात या रेल्वे मार्गासाठीचे भूसंपादन सुरु व्हायला वीस वर्षांचा काळ निघून गेला. फलटण-लोणंद हे भूसंपादन होऊन तेथे रेल्वे मार्गही अस्तित्वात आला. बारामती-फलटण हे भूसंपादन रखडले होते.

आता मात्र रेल्वेच्या नियमानुसार, ब-यापैकी भूसंपादन संपलेले असून उर्वरित भूसंपादन वेगाने करण्याचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांचा प्रयत्न आहे.

रेल्वेने या कामाला आणखी उशीर होऊ नये या साठी जागा ताब्यात घेऊन तेथे मुरुमीकरणाचा पहिला टप्पा सुरु करण्याचा निर्णय घेत निविदा प्रसिध्द केली आहे.

साधारण एक वर्षात मुरुमीकरणाचे व त्यानंतर प्रत्यक्ष स्थानक उभारणी व रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. डिसेंबर 2025 पर्यंत हे काम संपविण्याचा रेल्वेचा प्रयत्न असेल.

Baramati-Phaltan-Lonand Railway
Pankaja Munde : कोणालाही इतरांच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये; अंबाबाईचं दर्शन घेत पंकजा मुंडेंचं सूचक विधान

कसा असेल रेल्वे मार्ग....

  • बारामती-फलटण हा 37 कि.मी. लांबीचा रेल्वेमार्ग असेल.

  • यात चार मोठे पूल, 26 मेजर पूल, 23 मायनर पूल व 7 आरओबी असतील.

  • नीरा व क-हा नदी, नीरा डावा कालव्यावर पूल उभारले जातील.

  • न्यू बारामती, माळवाडी व ढाकाळे अशी तीन रेल्वे स्थानके या मार्गावर नव्याने उभारली जातील.

  • पहिल्या टप्प्यात एकेरी रेल्वेमार्ग टाकला जाईल.

  • हा रेल्वे मार्ग विद्युतीकरणासह सुरु होईल.

  • दोन वर्षात काम पूर्ण करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असेल.

  • दोन टप्प्यात 600 कोटी रुपये यावर खर्च केले जातील.

वेळ व अंतर यांची होईल बचत...

सध्या बंगळूरमार्गावर जाण्यासाठी पुणे ते लोणंद व दौंड ते पुणे असे तब्बल 166 कि.मी. अंतर पार करावे लागते. बारामती-फलटण-लोणंद रेल्वे मार्ग झाल्यानंतर हेच अंतर 104 कि.मी. इतके कमी होईल. याचाच अर्थ 62 कि.मी. अंतर कमी होऊन वेळ, इंधन यांची बचत होईल. इंजिनची दिशा बदलण्याची गरज भासणार नाही.

Baramati-Phaltan-Lonand Railway
Loksabha Election : भाजप लोकसभेत घेणार काँग्रेसचा बदला! 'हा' हुकमी एक्का काढला बाहेर, राष्ट्रीय राजकारणात होणार दमदार एन्ट्री?

पाठपुराव्याने मिळाली गती....

हा रेल्वे मार्ग वेगाने पूर्ण होण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी रेल्वे विभाग, राज्य शासन, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केल्याने या कामाला गती मिळाली आहे.

Baramati-Phaltan-Lonand Railway
Satara Politics : 'त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार, रामराजे काय आहे हे निवडणुकीपूर्वीच बघायला मिळेल'; NCP नेत्याचा सूचक इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com