esakal | लेकरांचा मृतदेह पाहून आई-बापानं फोडला हंबरडा; भावंडांचा कालव्यात बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

लेकरांचा मृतदेह पाहून आई-बापानं फोडला हंबरडा

नशीब बलवत्तर असल्याने सुदैवानेच दोन बालके बचावली आहेत.

लेकरांचा मृतदेह पाहून आई-बापानं फोडला हंबरडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अथणी : कोहळ्ळी (ता. अथणी) येथे करी मसुती पाणी योजनेच्या कालव्यात चार बालके खेळत होती. त्यातील बहिण-भावाचा कालव्यात पडून मृत्यू झाला. शनिवारी (९) सायंकाळी ही घटना घडली. विजय विनायक फंडीफुल्ले (वय 7) व स्वप्ना विनायक फंडीफुल्ले अशी मृत बालकांची नावे आहेत. तर नशीब बलवत्तर असल्याने सुदैवानेच दोन बालके बचावली आहेत. ऐगळी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फंडीफुल्ली यांच्या एकाच कुटुंबातील चार बालके शनिवारी (9) कालव्याच्या बाजूस खेळत होती. त्यांचा तोल जावून चारही बालके कालव्यात पडली. ही माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ऐगळी पोलिस ठाण्यात माहिती देऊन अथणी अग्निशामक दलाला पाचारण केले. श्रीधर शंकर फंडीफुल्ले (वय 3) व विश्वनाथ विनायक फंडीफुल्ले या दोन बालकांना वाचवण्यात अग्निशामक दलाला यश आले. अन्य दोन बालके सापडली नाहीत. चारी बाजूंनी शोध मोहीम राबवल्यानंतर विजय विनायक फंडीफुल्ले, स्वप्ना विनायक फंडीफुल्ले ही दोन बालके मृत अवस्थेत आढळली.

हेही वाचा: तरुणांना आकर्षण 50 रुपयाच्या पुडीचे

घटनेची माहिती समजताच मृताच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी हंरबडा फोडला. मृत बालकांच्या मृतदेहांची अथणी शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बचावलेल्या बालकांची प्रकृती सुधारत आहे. ऐगळी पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

ऐन दसरा सणात काळाचा घाला

दसरा सणाला प्रारंभ झाला आहे. पण नियतीने फंडीफुल्ले कुटुंबीयांच्या समोर काही वेगळेच वाढून ठेवले होते. विजय फंडीफुल्ले व स्वप्ना फंडीफुल्ले यांना हिरावून नेऊन ऐन दसरा सणात काळाने घाला घातला. या घटनेमुळे अथणी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: राम-कृष्ण, रामायण-गीतेच्या 'राष्ट्रीय सन्मानासाठी' संसदेनं कायदा करावा: हायकोर्ट

loading image
go to top