

Sangli Rural Police register case after a farmer from Samdoli lost ₹8.4 lakh in a fraud; probe underway.
sakal
सांगली : समडोळी (ता. मिरज) येथील शेतकऱ्यास ऊस तोडणी मजूर पुरवतो, असे सांगून ८ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत भाऊसाहेब लक्ष्मण देसाई (वय ६१) यांनी संशयित अंकुश मधुकर गेजगे (वय ३५), दिलीप मधुकर गेजगे (वय २५) या दोघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.