esakal | धक्कादायक! बेळगावात पान टपरी चालकाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime

याप्रकरणी संशयित दत्तात्रय उर्फ दत्ता शिवानंद उर्फ शिवाप्पा जंतीकट्टी (रा.भारतनगर शहापूर) याच्याविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे.

धक्कादायक! बेळगावात पान टपरी चालकाचा खून

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव: उधारी देण्यास नकार दिल्याने पान टपरी चालकाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना लक्ष्मी नगर तिसरा क्रॉस वडगाव येथे मंगळवार (ता.१४) रात्री घडली आहे. बाळकृष्ण नागेश शेट्टी (वय ५०, मूळ रा. कुंदापूर जि. उडपी सध्या रा. लक्ष्मीनगर तिसरा क्रॉस वडगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संशयित दत्तात्रय उर्फ दत्ता शिवानंद उर्फ शिवाप्पा जंतीकट्टी (रा.भारतनगर शहापूर) याच्याविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे.

हेही वाचा: बेळगाव : गुन्हेगारीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अनेक वर्षापासून लक्ष्मीनगर येथे बाळकृष्ण हे पान टपरी चालवत होते. काल रात्री संशयित दत्तात्रेय त्यांच्या पान टपरीवर गेला होता. त्यावेळी त्याने उधारी साहित्य देण्याची मागणी केली. मात्र, बाळकृष्ण यांनी उधारी देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात तो तेथून निघून गेला. रात्री नेहमीप्रमाणे पान टपरी बंद करून १०.०५ च्या सुमारास बाळकृष्ण हे आपल्या घराकडे आले. त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या दत्तात्रेय याने अचानक बाळकृष्ण यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पोटात चाकू भोसकला तसेच तोंडावर व शरीरावर देखील सपासप वार केले. त्यामुळे बाळकृष्ण रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा: बेळगाव : दुचाकी चोरट्याच्या बेळगाव पोलीसांनी मुसक्या आवळल्या

खून केल्यानंतर संशयितांने घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती समजताच शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी नागराज जयशिल शेट्टी (वय ३४, मूळ रा. कुंदापूर सध्या रा. लक्ष्मीनगर बनशंकरी गल्ली वडगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. संशयिताच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. या प्रकरणी रात्री १ वाजता खुनाच्या घटनेची नोंद पोलिसांनी करून घेतली आहे.

loading image
go to top