नगर : गर्भलिंग निदान करून गरोदर महिलेचा गर्भपात केल्याच्या आरोपावरून डॉक्टरासह सात जणांविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
औषधविक्रेता माऊली गायकवाड, मच्छिंद्र वायफळकर, सुमन वायफळकर, अश्विनी मच्छिंद्र वायफळकर (सर्व रा. जामखेड), डॉ. पाटील (रा. अकलूज, पूर्ण नाव समजले नाही), अन्य दोघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज हरिभाऊ खराडे यांनी फिर्याद दिली.
आरोपी माऊली गायकवाड व अन्य आरोपींच्या संगनमताने अकलूजलगतच्या एका गावात आरोपी गरोदर महिला अश्विनी वायफळ हिची गर्भलिंग निदान चाचणी झाली. तेथील डॉक्टरांनी तिला स्त्री जातीचा गर्भ असल्याचे सांगितले.
त्यानंतर तिने माऊली गायकवाड याच्या मेडिकलमधून बेकायदा गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. त्याचे सेवन करून गर्भपात केला. गर्भपातानंतर पुढील उपचारासाठी अश्विनीला खासगी रुग्णालयात नेल्यावर गर्भलिंग निदान तपासणी करून गर्भपात केल्याचे तेथील डॉक्टरांच्या लक्षात आले.
भाऊ आणि पित्यावर बलात्काराचा गुन्हा
मूल जन्माला येण्यास प्रतिबंध करणे किंवा जन्माला आल्यानंतर त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशान कृती केल्याच्या आरोपावरून वरील आरोपींविरुद्ध जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी माऊली गायकवाड, मच्छिंद्र वायकर व अन्य एकास अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
|