पुणे बंगळूर नॅशनल हायवेवर भीषण अपघात; कोल्हापूरच्या एकाचा मृत्यू

accident in pune near pune benglor haighway one died one injured in nipani belgam
accident in pune near pune benglor haighway one died one injured in nipani belgam
Updated on

निपाणी (बेळगाव) : भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील गव्हाण फाट्याजवळ सोमवारी (ता. १५) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गणेश ज्ञानदेव पोवार (वय २३, रा. सुभाषनगर-कोल्हापूर) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अनुराग मनोज बागडीकर (वय २२, रा. आरकेनगर-कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर येथील गांधी रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी गडहिंग्लज येथे हलविले आहे.

याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, गणेश पोवार व अनुराग बागडीकर हे दोघे  दुचाकीवरून कोल्हापूरहून संकेश्वरकडे निघाले होते. निपाणीजवळील गव्हाण फाट्याजवळ आल्यानंतर दुचाकीवरील ताबा सुटल्याने महामार्गाकडेला असलेल्या सिमेंटच्या संरक्षण खांबांना दुचाकीची  जोरात धडक बसली. या धडकेत तब्बल तीन खांब मोडून पडले. या धडकेत गणेश दुचाकीपासून सुमारे पंधरा फूट लांब जाऊन पडले. त्यांच्या डोके, छाती आणि पायाला दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मनोज बागडीकर यांनाही दुखापत झाली असून ते गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर महात्मा गांधी रूग्णालयात उपचार करून गडहिंग्लज येथे पाठविले आहे.

अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे भीडचे मॅगव्हील तुटले आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, सहाय्यक उपनिरीक्षक आर. बी. शेख, एस. एस. चिकोडी, बसवराज नावी, एच. एच. नायक व सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. निपाणी शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Koyna Dam water level July 2026
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com