
कृष्णात पिंगळे - राजारामबापू कारखान्यावर वाहनांना रिफ्लेक्टर
इस्लामपूर (सांगली) : आपल्या चुकीमुळे आपले किंवा दुसऱ्याचे कुटुंब उध्वस्त होणार नाही, याची काळजी घ्या. दारू पिऊन वाहन चालवू नका. वाहनांवर टेप रेकॉर्डचा आवाज मर्यादीत ठेवा. अन्यथा कडक कारवाई करू, असा इशारा उपविभागीय पोलीस आधिकारी कृष्णात पिंगळे यांनी राजारामनगर येथे ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना दिला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सुरक्षा सप्ताहानिमित्त पिंगळे यांच्याहस्ते ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव, वाहन विभाग प्रमुख सुनिल जाधव, सुरक्षधिकारी विरसेन गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
हेही वाचा- जंगल सफारी करताना वाघ बघायचा आहे
पिंगळे म्हणाले, "एखाद्या छोट्याशा चुकीनेही झालेल्या अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत, अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. आपण वाहन चालवताना आपल्या कुटुंबाचा व दुसऱ्यांच्याही कुटुंबाचा विचार करा. वाहनास लावल्याने 500 मीटरवरचे वाहन दिसते, त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होते. दारू पिणे शरीरास अपायकारक आहे, तर दारू पिऊन वाहन चालविणे कायद्याचे उल्लंघन आहे. असे आढळल्यास तुमच्या वाहनातील ऊस कारखान्यात खाली केल्यानंतर वाहन पोलीस ठाण्यात लावून घेवू." शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्वागत केले.
सुरक्षाधिकारी विरसेन गायकवाड, लक्ष्मण ढोले,केनयार्ड सुपरवायझर विजय कुलकर्णी, भास्कर केवळे, संजय पाटील,राजेंद्र पाटील,धनाजी पाटील,दिपक पाटील,राहुल शिंदे, सुनिल यादव,रवि बुधावले,हेमंत पाटील उपस्थित होते.
संपादन- अर्चना बनगे