नेवाशात घडला हिंगणघाट : प्रेयशीसोबतची त्याची सेक्स क्लिप तिने पाहिली अन...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून पेटवून दिल्याची घटना ताजी असतानाच, तसाच काहीसा प्रकार नेवासे तालुक्‍यातील मोरेचिंचोरा येथे समोर आला आहे

सोनई (ता. नेवासे, नगर) : हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून पेटवून दिल्याची घटना ताजी असतानाच, तसाच काहीसा प्रकार नेवासे तालुक्‍यातील मोरेचिंचोरा येथे समोर आला आहे. पतीच्या अनैतिक संबंधाचा मोबाईलमधील "व्हिडिओ' पाहिल्याच्या रागातून विवाहितेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले. स्वाती शंकर दुर्गे (वय 22, रा. मोरेचिंचोरा) असे या विवाहितेचे नाव आहे. या घटनेत ती गंभीर भाजली आहे. 

जाणून घ्या- श्रीगोंद्यातील "ती' सैराट झाली जी.. 

मोरेचिंचोरे (ता. नेवासे) येथे रविवारी (ता. 9) हा प्रकार झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या स्वाती दुर्गे हिच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पती शंकर पाराजी दुर्गे, सासू चंद्रकला दुर्गे व कांचन संजय गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. 

अनैतिक संबंधाचा "व्हिडीओ'

जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या स्वाती दुर्गे हिने पोलिसांना जबाब दिला. त्यानुसार सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जबाबात स्वाती दुर्गे हिने म्हटले आहे, की पती शंकर दुर्गे याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्याचा "व्हिडीओ' त्याने मोबाईलमध्ये "रेकॉर्ड' केला होता. हा "व्हिडीओ' पाहिल्याच्या रागातून पती शंकर याने पत्नी स्वातीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. सासू चंद्रकला दुर्गे व कांचन संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करीत स्वातीला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. 

जाणून घ्या- नगरसेवक घुसले जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत 

तिन्ही आरोपी पसार

गंभीर जखमी अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. फौजदार ज्ञानेश्वर थोरात यांनी मोरेचिंचोरे येथील राहत्या घराला भेट देऊन पंचनामा केला. घटनेनंतर तिन्ही आरोपी पसार झाले आहेत. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After watching his sex clip with the boyfriend then the hinganghat happened in newasa