esakal | VIDEO : नगर महापालिकेने उघडले अन्नछत्र, कम्युनिटी किचनद्वारे गरिबांना जेवण
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Municipal Corporation opens food pantry

या उपक्रमांतर्गत रोज जाधव लोन येथे दुपारी बारा वाजता गरीब व गरजू व्यक्तींना अन्नाचे पॅकेट वाटप केले जाणार आहे. तसेच शहरातील बोल्हेगाव, सावेडी, स्टेशन रोड परिसरातही कम्युनिटी किचन उपक्रम सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

VIDEO : नगर महापालिकेने उघडले अन्नछत्र, कम्युनिटी किचनद्वारे गरिबांना जेवण

sakal_logo
By
अमित आवारी

नगर : लॉकडाऊनच्या काळात महापालिकेने सामाजिक कार्याचा वसा हाती घेतला आहे. याअंतर्गत महापालिका परप्रांतीयांची निवास व भोजन व्यवस्था तसेच शहरातील गरीब व गरजूना भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे कीट पुरवण्यासाठी महापालिकेने हेल्पलाइन नावाचा उपक्रम सुरू केला आहे.

शहरातील काही गोरगरीब नागरिकांना दोन वेळच्या जेवणाचीही ही भ्रांत पडली आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी आजपासून कम्युनिटी किचन हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम म्हणजे महापालिकेचे जणू अन्नछत्रच आहे.

हेही वाचा - नगरमध्ये पुन्हा एक कोरोनाचा रूग्ण

कम्युनिटी किचन उपक्रमाचे आज महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या हस्ते नगर-कल्याण रस्त्यावरील जाधव लॉन येथे उद्घाटन झाला. यावेळी महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, यंत्र अभियंता परिमल निकम, शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्य अधिकारी नरसिंह पैठणकर, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, प्रसिद्धी विभाग प्रमुख दिगंबर कोंडा, गणेश लयचेट्टी, बाळू विधाते आदी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत रोज जाधव लोन येथे दुपारी बारा वाजता गरीब व गरजू व्यक्तींना अन्नाचे पॅकेट वाटप केले जाणार आहे. तसेच शहरातील बोल्हेगाव, सावेडी, स्टेशन रोड परिसरातही कम्युनिटी किचन उपक्रम सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे. तसेच काही गरीब घटना त्यांच्या घरापर्यंत ही अन्नाच पॅकेट पोहोच करण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती परिमल निकम यांनी दिली.

कम्युनिटी किचन उपक्रमात आज सुमारे 200 जणांना अन्नाचे पॅकेट वाटण्यात आली. या पॅकेटमध्ये पोळी व पातळ बटाट्याची भाजी देण्यात आली. पॅकेट घेण्यासाठी आलेल्या नागरिकांत सोशल डिस्टन्स राहील याची खबरदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली. त्यासाठी रांगा तयार करून त्यात दोन व्यक्तींसाठी अंतर राहण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली. वर्तुळातच नागरिकांनी थांबावे, असे सांगण्यात आले होते, त्यानुसार सोशल डिस्टन्स नियम पाळत नागरिकांनी अन्नाचे पॅकेट स्वीकारली. रोज एकावेळी तीनशे ते साडेतीनशे लोकांचे जेवण वाटप होणार आहे.


 

loading image
go to top