Maharashtra-Karnataka Border Issue : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नात कर्नाटक सरकार मराठी माणसांची गळचेपी करत आहेच. त्यासाठी कोणतीही संधी ते सरकार सोडत नाही. ते कमी आहे, म्हणूनच या सरकारने आलमट्टी उंचीवाढीचा घाट घातला आहे. ४.६५६ मीटरने उंची वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारने (Karnataka Government) जोरदार पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या विरोधात कोल्हापूर, सांगलीतील आंदोलनकर्तेच पुढे येऊ लागले आहेत.