esakal | शनिवारपासून होणार जनावर बाजारास सुरूवात 
sakal

बोलून बातमी शोधा

Siddheshwar_yatra.jpg

जनावर बाजारात महाराष्ट्रातील मराठवाड्यासह विविध खेड्यातील जनावरे या बाजारात विक्रीसाठी येणार आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात येथील जनावरे विक्रसाठी बाजारात दाखल होणार आहे. या बाजारात खिलार, गीर, देवणी जातीचे वळू व बैल बाजारात विक्रीसाठी साठी येणार आहेत. तसेच मुरा, पंढपूर, जाफराबादी जातीच्या या म्हशी घोडेगाव, म्हैसाना येथून बाजारात विक्रीसाठी येणार असून गाय, शेळ्या, मेंढ्या यांचा देखील या जनावर बाजारात विक्रीसाठी दाखल होणार आहेत. 

शनिवारपासून होणार जनावर बाजारास सुरूवात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर, : ग्रामदैवत सिध्देश्‍वर यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर विजापूर रोड वरील रेवणसिध्देश्‍वर मंदिरा समोरील मोकळ्या जागेत जनावराचा बाजार भरणार असल्याची माहिती जनावर बाजार समितीचे अध्यक्ष चिदानंद वनारोटे यांनी दिली. 
हेही वाचा : यामुळे नंदीध्वज ठरते आकर्षणाचा केंद्रबिंदू 
या जनावर बाजारात महाराष्ट्रातील मराठवाड्यासह विविध खेड्यातील जनावरे या बाजारात विक्रीसाठी येणार आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात येथील जनावरे विक्रसाठी बाजारात दाखल होणार आहे. या बाजारात खिलार, गीर, देवणी जातीचे वळू व बैल बाजारात विक्रीसाठी साठी येणार आहेत. तसेच मुरा, पंढपूर, जाफराबादी जातीच्या या म्हशी घोडेगाव, म्हैसाना येथून बाजारात विक्रीसाठी येणार असून गाय, शेळ्या, मेंढ्या यांचा देखील या जनावर बाजारात विक्रीसाठी दाखल होणार आहेत. 
हेही वाचा : भारत बंदल सोलापूरात अल्प प्रतिसाद 
यावेळी 5 ते 6 हजार जनावरे बाजारात विक्रीसाठी येणार 

यावेळी 5 ते 6 हजार जनावरे बाजारात विक्रीसाठी येणार असल्याचा अंदाज आहे. या बाजारात जवळपास पाच ते सात कोटींची उलाढाल आपेक्षीत आहे. बाजारात विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सिध्देश्‍वर देवस्थान मंदिर समितीच्या वतीने. पीण्याच्या पाण्याची व्यवस्था,मैदानावर प्रत्येक ठिकाणी सायंकाळी लाईट बसविण्यात येणार आहे. त्यासाठी पाच टॉवरची बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. जनावरांसाठी स्वत्रंत पीण्याच्या पाण्यासाठी हौद बांधण्यात आला आहे. या जनावर बाजार व्यवस्थीत व्हावा यासाठी सिध्देश्‍वर यात्रेचे अध्यक्ष बाळासाहेब पटणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. या मध्ये काशिनाथ दर्गोपाटील, मल्लिनाथ कळके, सुभाष मुनाळे, निलकंठ कोन्हापूरे सदस्य असणार आहेत. 
या जनावर बाजारा सोबतच जनावरांनासाठी लागण्याऱ्या दोरखंड, बाशिंग, घुंगरू, चाबुक त्याचबरोबर शेतीसाठी लागणारे आवजारे विक्रीचे दुकाने सुध्दा बाजारात असणार आहेत. जनावरांची दोन दवाखाने असणार आहे त्या मध्ये एक सरकारी दवाखाना असणार आहेत तर दुसरा खासगी दवाखाना असणार आहे. या खासगी दवाखान्याच्या वतीने जनवरांना मोफत उपचार व औषधे देण्यात येणार आहेत. 

दोन आठवडे उशीरा सुरू बाजार 
गेल्या दोन ते तीन वर्षापासून रेवणसिध्देश्‍वर समोरील मोकळ्या मैदानावर जनावर बाजार भरविण्यासाठी आडचणी येत होत्या. शेजारीच प्राणी संग्रालय असल्याने या ठिकाणी जनावर बाजार भरत असल्याने संग्रालयातील प्राण्यांना धोका असल्याने महापालिका या जागेवर बाजार भरविण्यास महापालिकेची परवानगी देत नव्हती मात्र मंदिर समितीने पर्यायी जागेसाठी पत्र दिले होते त्या ठिकाणी जनावर बाजार भरविण्यास आडचणी येत असल्याने रेवणसिध्देश्‍व मंदिराच्या समोरील जागेवरच जनावर बाजार भरविण्यास परवानगी दिली. मात्र ही परवानगी देण्यास दोन आठवडे विलंब झाल्याने कित्येक व्यापाऱ्यांनी या बाजाराकडे पाठ फिरवली खंत मंदिर समितीच्या सदस्यांनी केली. 
 

loading image