बेडकिहाळमध्ये अप्पासाहेब नारे यांनी घेतला एकरी 98 टन ऊस

बेडकिहाळ येथील प्रगतशील शेतकरी अप्पासाहेब नारे यांनी एकरी ९८ टन उसाचे उत्पादन घेतले आहे.
appasaheb nare
appasaheb naresakal

बेडकिहाळ - येथील प्रगतशील शेतकरी अप्पासाहेब नारे यांनी एकरी ९८ टन उसाचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी ८६०३२ जातीच्या उसाची लागण केली होती. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाचे कौतूक होत आहे.

नारे यांनी दोन एकर क्षेत्रात २५ जुलै २०२० रोजी ८६०३२ या उसाची एक डोळा कांडी पद्धतीने लावण केली होती. या क्षेत्रात पूर्वीही उसाचे पीक होते. ऊस गेल्यानंतर सरीतील पाला यंत्राच्या सहाय्याने कुट्टी करून एक बार सरीतून भरला. ऊस लावणीसाठी साडेचार फूट सऱी सोडली होती. सरीत पाणी सोडून १.२५ फुटाच्या अंतरावर उसाच्या कांड्या ठेऊन लावण केली.

appasaheb nare
बेळगाव : गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

ऊस क्षेत्रासाठी फॉसफरिक अॅसिडची तीन वेळा आळवणी घेतली. जवाहर साखर कारखान्याकडून दहा पोती १०-२६-२६ लागवड, आठ पोती युरिया, साठ किलो मायक्रो नुट्रेट घातले. तणनाशकाची दोनवेळा फवारणी केली. पाट पद्धतीने १२ ते १५ दिवसाने पाणी सोडले. उसाच्या एका गड्डयात १२ ते १५ ऊस होते. ऊस तोडणीवेळी उसाच्या ३५ ते ३८ कांड्या होत्या. एक ऊस २ किलो होता. एकूण या क्षेत्रात एकरी ९८ टनावर उतारा मिळाला.

त्यांना जवाहर साखर कारखान्याच्या शेती विभागातील अधिकाऱ्यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळाले आहे. विभागीय शेती अधिकारी अनिलकुमार चौगले यांनीही भेट देऊन पाहणी केली होती. मजुरांकडून तोडणी केली असून २ एकर १० गुंठे क्षेत्रात २२० टन उतारा मिळाला आहे.

या ऊस क्षेत्रात आगस्ट महिन्यात तीन-चार दिवस तीन फूट महापुराचे पाणी आले होते. पण यावेळी ऊस चांगलाच उंच झाला होता. सन २०१५-१६ साली याच क्षेत्रात २६५ या जातीच्या उसाचा एकरी ११५ टनापर्यंत उतारा मिळाला होता. आपण व्यवस्थित नियोजन केल्यास व पाचट न जाळता यंत्राद्वारे कुट्टी करून सरीत भरल्याने त्याचा ऊस उत्पादनावर चांगला परिणाम होतो.

- अप्पासाहेब नारे, प्रगतशील शेतकरी, बेडकिहाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com