मुरगुडचे सहायक पोलिस निरीक्षक तडकाफडकी निलंबित; कारण काय वाचा

Assistant Police Inspector Shinde Suspended Why
Assistant Police Inspector Shinde Suspended Why
Updated on

मुरगूड ( कोल्हापूर ) - येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे मुरगूडसह कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

सहायक पोलिस निरीक्षक शिंदे यांना मुरगूड परिसरातील काळे धंदे रोखण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी वेळोवेळी लेखी सूचना दिल्या होत्या; पण श्री. शिंदेंनी वरिष्ठांच्या आदेशाकडे डोळेझाक केली आणि प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे काळा धंद्यांना सहकार्य केल्याचा ठपका ठेवून डॉ. देशमुख यांनी त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली. काळ्या धंद्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर प्रसंगी निलंबनाची कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही डॉ. देशमुख यांनी वेळोवेळी दिला होता.

जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई

शनिवारी (ता. ३०) विशेष पथकाने मुदाळतिट्टा आणि मुरगूड परिसरातील मटका व त्यानंतर शुक्रवारी (ता. ६) अर्जुनी (ता. कागल) येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. यानंतरही डॉ. देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक शिंदे यांना लेखी आदेश दिले होते; मात्र शिंदेंनी वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी रात्री या वृत्ताला दुजोरा दिला.

कुणकुण

मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांचे निलंबन करण्यात येणार असल्याची कुणकुण कालच (ता. ७) मिळाली होती. शिंदे आठ महिन्यांपूर्वीच मुरगूड ठाण्यात रुजू झाले होते.

कर्तव्यात कसूर केल्याने निलंबन

कर्तव्यात कसूर केल्याने सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांना निलंबित केले आहे. त्यांच्या जागी सध्या इस्पुर्ली पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या विद्या जाधव यांची नेमणूक केली.
- डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

What is Property Card in Maharashtra?
Muslim Gorakshak Dal in Miraj
Sangli Vishrambag Savarkar statue issue
Sangli Accident News Konkan tourism
Marathi News Esakal
www.esakal.com