वाजपेयीनगरचा फलक हटवल्याने खानापुरात वादंग; फलक लावल्यानंतर वादावर पडदा

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने तालुका भाजपच्या वतीने येथील वाजपेयीनगरातील नामफलकाचे नगराध्यक्षा नारायण मयेकर यांच्या उस्पस्थतीत उद्घाटन करण्यात आले होते.
atal bihari vajpayee board
atal bihari vajpayee boardsakal
Summary

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने तालुका भाजपच्या वतीने येथील वाजपेयीनगरातील नामफलकाचे नगराध्यक्षा नारायण मयेकर यांच्या उस्पस्थतीत उद्घाटन करण्यात आले होते.

खानापूर - दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने तालुका भाजपच्या वतीने येथील वाजपेयीनगरातील नामफलकाचे नगराध्यक्षा नारायण मयेकर यांच्या उस्पस्थतीत उद्घाटन करण्यात आले होते. पण कोणतीही परवानगी न घेता नामफलक लावल्याचे सांगत नगरपंचायतीने हा फलक मंगळवारी काढला.यावरून खानापुरात मोठा वादंग निर्माण झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी न पं समोर ठीया आंदोलन करुन मुख्याधिकाऱ्यांच्या बदली सह फलक लावण्याची मागणी लावून धरली. अखेर फलक लावल्या नंतर वादावर पडदा पडला.

खानापूर शहरातील बेघरांना घरकुल मिळावे यासाठी तत्कालीन आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी आश्रय योजना आणली होती. वाजपेयी आवास योजनेअंतर्गत ही नवीन वसाहत वसवण्यात आल्याने 2020 मध्ये नगरपंचायतीने ठराव घालून सदर वसाहतीला वाजपेयीनगर म्हणून नाव दिले होते. याबाबत बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मंजुरी दिली होती. नगर पंचायतीने दिलेल्या हक्कपत्रात वाजपेयीनगर म्हणून देखील उल्लेख आहे. रविवारी झालेल्या अटलबिहारी वाजपेयी जयंती दिवशी या ठिकाणी वाजपेयीनगर म्हणून फलक लावण्यात आला होता. पण मंगळवारी सकाळी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी हा फलक उखडून काढला. या फलकासाठी रीतसर परवानगी नसल्याचे सांगण्यात आले.

भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखालील युवा कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन छेडले. दोन तासांच्या आंदोलनानंतर मुख्याधिकारी राजू वठारे यांनी दिलगिरी व्यक्त करून फलक लावण्याची ग्वाही दिली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता वाजपेयीनगर फलक लागल्यानंतर वादावर पडदा पडला. यावेळी बोलताना पंडित ओगले यांनी वाजपेयीनगराचा सर्व घटनाक्रम सांगून आवश्यक असलेले सर्व पुरावे सादर केले. जोपर्यंत नामफलक लावण्यात येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालूच ठेवण्याचा त्यानी इशारा दिला. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. फलक हटवण्यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नगराध्यक्ष नारायण मरेकर यांनी देखील अकार्यक्षम अशा मुख्याधिकाऱ्यांना खानापूर नगरपंचायतीतून अन्यत्र हलवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी भाजप नेते आनंद पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष जॉर्डन गोन्सालविस, संजय मयेकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष दिनकर मरगाळे, संतोष देवलतकर, रामा साळुंखे, नितीन गावडे, किरण येळ्ळूरकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमाणी, ज्योतिबा कुंभार तसेच वाजपेयी नगरचे नागरिक, युवा भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com