Coronavirus : शेतकरी, नागरीकांसाठी सरकारचे प्रयत्न सुरु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

लोकांना त्यांच्या घराच्या, आपार्टमेंच्या परिसरातच तो उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन सुरु आहे. त्यामुळे लोकांनी घाबरुन न जाता अधिकचा साठा करु नये.

कऱ्हाड : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रुग्णांची संख्या सर्वत्र वाढत आहे. परिणामी राज्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात भाजीपाला आहे. पुणे-मुंबई बाजार समितीतही भाजीपाला मोठ्या प्रमाणात आहे. शेतीमधुन माल मंडईमध्ये नेण्याची व्यवस्था करण्यासाठी शासनाकडुन नियोजन सुरु आहे. शेतकरी संधी मिळेल त्यावेळी अपार्टमेंटमध्ये भाजीपाला विक्रीसाठी घेवुन येतील. त्यामुळे नागरीकांनी काळजी करण्याचे कारण नाही, असा दिलासा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज (मंगळवारी) दिला.

कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभुमीवर नागरीकांना भाजीपाला मिळणार की नाही अशी भिती व्यक्त होत आहे. त्यापार्श्वभुमीवर सहकारमंत्री पाटील यांनी स्पष्टीकरण केले. नागरीकांना धान्य भाजीपाला, फळे मिळाली पाहिजे, मेडीकल उघडे राहिले पाहिजेत, यासाठी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.
 
लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी माल मार्केट यार्डमध्ये आणल्यानंतर व्यापाऱ्यांनी तो खरेदी करुन गावोगावच्या किरकोळ व्यापाऱ्यांना पाठवणे गरजेचे आहे. मात्र ग्राहकच आता मार्केट यार्डमध्ये भाजीपाला नेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या सुरक्षीत अंतर ठेवणे आणि अडचणीच्या काळात घरीच राहणे फार महत्वाचे आहे. काही काळासाठी संचारबंदी शिथील केल्यानंतर नागरीकांनी अचानक भाजी खरेदीसाठी गर्दी करु नये.

त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात भाजीपाला आहे. पुणे-मुंबई बाजार समितीत भाजीपाला मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरीकांनी काळजी करण्याचे कारण नाही. शेतीमधुन माल मंडईमध्ये नेण्याची व्यवस्था करण्यासाठी नियोजन सुरु आहे. शेतकरी संधी मिळेल त्यावेळी अपार्टमेंटमध्ये भाजीपाला घेवुन जातील. लोकांना त्यांच्या घराच्या, आपार्टमेंच्या परिसरातच तो उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन सुरु आहे. त्यामुळे लोकांनी घाबरुन न जाता अधिकचा साठा करु नये.

#WeVsVirus : सकाळ डिजिटल हॅकेथॉन; सहभागी व्हा 

आई जाण्याचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी बजावले कर्तव्य

सख्खे शेजारी पण, वेशीवरुनच राम रामकरी

सातारा जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या पाेहचली दाेनवर

सातारकरांनाे आता तुमची साथ हवी आहे : जिल्हाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Patil Assures Citizens To Get Vegtables At Their Location