त्याला व्हायचे हाेते माेठा कीर्तनकार पण...

त्याला व्हायचे हाेते माेठा कीर्तनकार पण...

विंग (जि. सातारा) ः कऱ्हाड तालुक्‍यातील विंग येथील आकाश कृष्णत घोरपडे (वय 19) या बालकीर्तनकाराचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी औषध प्राशन करून त्याने जीवनयात्रा संपवली. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी आकाशचा मृत्यू अनेकांच्या जिवाला चटका लावून गेला.

याबाबतची अधिक माहिती अशी शुक्रवारी (ता. 28) औषध प्राशन केल्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचाराला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मुंबईच्या कांजूरमार्ग पोलिसात घटनेची नोंद झाली आहे, अशी माहिती मुंबईतील स्थायिक ग्रामस्थांनी दूरध्वनीवरून दिली. मंगळवारी (ता.3) दुपारी विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आकाशच्या घरची परिस्थिती बेताची आहे. खेळण्या- बागडण्याच्या वयातच त्याने सांप्रदायिक मार्ग स्वीकारला होता. दोन वर्षांपूर्वी तो आळंदी येथे सावता माळी वारकरी सांप्रदायात सहभागी झाला होता. तत्पूर्वी तेरच्या वारकरी शिक्षण प्रसारक मंडळात तो होता. त्याची मोठा कीर्तनकार बनण्याची इच्छा होती. दरम्यान, तो मुंबईत एका दुकानात नोकरीस लागला. दिवसभर नोकरी करून तो रात्री सांप्रदायिक शिक्षण तो घेत होता, असे ग्रामस्थांनी सांगितले. येथे झालेल्या ज्ञानेश्वरी सप्ताहात त्याने बालकीर्तनही केले होते. त्याच्या मागे आई- वडील व एक भाऊ असा परिवार आहे. वडील मूकबधिर असून, आई अशिक्षित आहे. त्याच्या भाऊ कडेगावला प्राथमिक शिक्षण घेत आहे. 

 हेही वाचा : आता खुले मतदानच घ्या

बेपत्ता आदित्य शिंदेचा मृतदेह विहिरीत आढळला

फलटण : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आदित्य संतोष शिंदे (वय 14) या इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य शिंदे (रा. ठाकुरकी) हा मुलगा नववीत शिकत होता. तो शुक्रवारी त्याच्या आईसोबत शेतामध्ये गेला होता. दुपारी त्याचा क्‍लास असल्याने तो आईला सांगून घरी निघाला; परंतु घरी पोचला नव्हता. त्यामुळे गेली तीन दिवस त्याचा शोध सुरू होता. शोध घेत असता ठाकुरकी गावच्या हद्दीत आदित्यचा मृतदेह त्यांच्याच शेतातील चुलत्याच्या विहिरीमध्ये आढळून आला.

वाचा : नराधमांनी माझ्या मुलाचा घात केला; न्याय मिळावा; आईची आर्त हाक

आदित्यचे चुलते गणेश वसंतराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. ही विहीर शेतामधून जाण्याच्या रस्त्यावर आणि कठडे नसलेली आहे. तो पाय घसरून विहिरीत पडला असावा, असा अंदाज पोलिसांनी प्रथमदर्शनी स्थितीवरून केला आहे. पोलिस हवालदार नितीन भोसले तपास करीत आहेत.

जरुर वाचा : शाब्बास : अक्षता पडण्यापुर्वी पाेलिसांनी राेखला विवाह 

वाचा : मुंबई : काेयनेतील बाेटींगसाठी कट्टर विराेधक एकत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com