esakal | विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आजही या 'परी'चा आधार!
sakal

बोलून बातमी शोधा

The basis of ST in student learning

ग्रामीण भागातून आजही शाळेसाठी, महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे एसटी होय. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात योगदान देणारी लालपरी म्हणजेच एसटी वर्षाला सांगोला तालुक्‍यातील तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांना मासिक पासची सवलत देत आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आजही या 'परी'चा आधार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगोला (सोलापूर) : ग्रामीण भागातून आजही शाळेसाठी, महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे एसटी होय. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात योगदान देणारी लालपरी म्हणजेच एसटी वर्षाला सांगोला तालुक्‍यातील तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांना मासिक पासची सवलत देत आहे. अहिल्यादेवी होळकर मोफत विद्यार्थिनी पास योजनेंतर्गत तालुक्‍यातील दोन हजार विद्यार्थिनींना लाभ मिळत आहे. तीन हजार विद्यार्थ्यांना एसटीच्या सवलतीच्या पास योजनेचा, साडेसात हजार ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड योजनेचा लाभ मिळत असल्याची माहिती आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी दिली. 

हेही वाचा : 'त्यांच्या कष्टाला पुरस्काराचे फळ'
२४ प्रकारच्या सवलती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) समाजातील विविध घटकांना प्रवासी भाड्यात 24 प्रकारच्या सवलती दिल्या जातात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात किती मोलाचा वाटा आहे, हे यावरून समजते. अहिल्यादेवी होळकर मोफत सवलत प्रवास योजनेमुळे माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत प्रवास आहे. सांगोला आगारामार्फत या योजनेचा तालुक्‍यातील दोन हजार विद्यार्थिनी लाभ घेत असून दर महिन्याला तब्बल 30 लाख रुपये आर्थिक बोजा एसटी सहन करत आहे. 

हेही वाचा : तुम्हाला माहिती आहे का? काळा रंग वापरू नये असे का म्हणतात?
शिक्षणात एसटीचा आधार

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन अशा विद्यार्थी मासिक पास सवलतीचा दोन हजार 900 विद्यार्थी लाभ घेत आहेत. विद्यार्थ्यांना नैमित्तिक करारावर एसटी बस देण्यात येतात. आजही जिल्ह्यातील खेड्यातील गरीब, सामान्य कुटुंबांतील मुले, मुली यांना शिक्षणात एसटीचाच आधार आहे, हे सिद्ध होते. कर्करोग, क्षयरोग यासारख्या आजारी रुग्णांना, अपंग व्यक्तींना प्रवासी भाड्यातील सवलतीचा लाभ झाला आहे. सांगोला तालुक्‍यातील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना एसटीचे सवलतीचे पास सहजरीत्या उपलब्ध झाले आहेत. या सवलतीच्या पासमुळे सांगोला आगाराला दर महिन्याला जवळपास 14 लाखांचे उत्पन्न मिळत आहे. तर तालुक्‍यातील सुमारे साडेसात हजार ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड योजनेचा लाभ मिळत आहे.

हेही वाचा : ... दीड वर्षाचा जयदीप आला चाकाखाली!
या आहेत सवलती

वार्षिक सवलत कार्ड योजना, संगणकीय आरक्षण, इंटरनेट तिकिटांची सुविधा, आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजना, प्रासंगिक करार, रातराणी फेऱ्यांच्या प्रवास भाड्यात सूट, वार्षिक सवलत कार्ड योजना, त्रैमासिक पास योजनेत 50 दिवसांच्या भाड्यात 90 दिवस प्रवास, मासिक पास योजनेत 20 दिवसांच्या भाड्यात महिनाभर प्रवास, अशा विशेष आकर्षक सुविधा प्रवाशांसाठी सुरू केल्या आहेत. एसटीने विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पासची सुविधा उपलब्ध केल्याने एसटीने प्रवास न करणारे विद्यार्थीही एसटीकडे वळतील आणि महसुलात वाढ होईल, असाही विश्‍वास एसटीतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र

loading image