आला पंचमीचा सण.. बत्तीस शिराळ्यात यंदा नागराजाचे घरीच पूजन

अंबामाता मंदिरात पुजाऱ्याने विधिवत पूजा; घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करण्यात आली
आला पंचमीचा सण.. बत्तीस शिराळ्यात यंदा नागराजाचे घरीच पूजन

शिराळा : येथे सकाळी घरोघरी महिलांनी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागपंचमी साजरी केली. सकाळी अंबामाता मंदिरात पुजाऱ्याने विधिवत पूजा केली. त्यानंतर घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करण्यात आली. कोरोनाच्या व नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या लोकांच्या शिराळा येथे येण्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या होत्या. शिराळा आगाराच्या तालुका अंतर्गत व लगतच्या एस.टी. फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आगार परिसरात शुकशुकाट होता.

आला पंचमीचा सण.. बत्तीस शिराळ्यात यंदा नागराजाचे घरीच पूजन
विजेच्या तारांच्या स्पर्शाने दोन गायींचा मृत्‍यू ; शेतकरीही जखमी

शहरातील लोकांच्या हालचाली टिपण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. महत्वाच्या ठिकाणी पोलिस व वनविभाग यांनी अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांचा चारशेवर फौजफाटा तैनात केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शिराळा कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. नागपंचमी व कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर करून काही निर्बंध घेतले असल्याने काल (१२) ऑगस्ट सायंकाळी 5 वाजल्या पासून ते उद्या १४ ऑगस्टच्या सकाळी ८ वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना शिराळा येथे येण्यास बंदी घातली आहे.

आला पंचमीचा सण.. बत्तीस शिराळ्यात यंदा नागराजाचे घरीच पूजन
दोन आजाराशी झुंज देत चढली 'ती' लग्नाच्या बोहल्यावर

ग्रामदैवत अंबाबाईच्या मंदिरात पालखीची पूजा करूनपालखी दुपारी तीन वाजता कासार गल्ली मार्गे वैजेश्वर मंदिरात जाऊन त्या ठिकाणी पूजा करून उत्तर पूजेसाठी पुन्हा महजन यांच्या घरी नेण्यात आली. पालखी साठी दहा व्यक्तींना पास देण्यात आले होते. अंबामाता मंदिर नागरिकांच्यासाठी मंदिर बंद केले होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करत शिराळा येथील नागपंचमी साजरी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com