दवंडीसाठी आता साऊंड बाॅक्सचा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दवंडीसाठी आता साऊंड बाॅक्सचा वापर

बेडकिहाळ : दवंडीसाठी आता साऊंड बाॅक्सचा वापर

बेडकिहाळ : `ढणं...ढणं... ढणा... ढणं... ऐका हो ऐका...गल्लीतली ऐका... घरातली ऐका...समस्त नागरिकांनी लक्ष्य देऊन ऐका...सांगितलं नाही म्हणू नका...ऐकलं नाही म्हणू नका...आज गावसभा आहे. साऱयांनी पाच वाजता न चुकता हजर राहावे हो...` अशी ही दवंडी यापूर्वी सर्वच गावातील नागरिकांनी ऐकलीच असेल. गाव लहान असो किंवा साधारण, अशारितीने माहिती दिली जात. पण काळाच्या अोघात पारंपरिक दवंडी मागे पडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता साऊंड बाॅक्सद्वारे दवंडी देण्यात येत आहे. बेडकिहाळ येथेही त्याचा प्रत्येय येत आहे.

हेही वाचा: बारामती सहकारी बँकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले

सरकारी आदेश असो वा इतर कोणतीही सार्वजनिक माहिती असो, ती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी गावात एक दवंडीवाला असायचा. त्याच्यामार्फत कोणतीही सार्वजनिक माहिती संपूर्ण गावात पोहोचविली जात. दवंडीतून दिलेल्या माहितीची अमलबजावणी होत. दवंडी देणाऱ्याला ज्या-त्या माहितीच्या आधारे मानधन देण्यात येत. तर विशेष म्हणजे चौका-चौकातून "ढणं...ढणं...ढणं...ढणी ढणं..." असा आवाज ऐकू आल्यावर गल्लीतील व आजूबाजूचे लोक एकत्रित येत. नवीन कोणता आदेश आला आहे, हे पाहण्यासाठी कान टवकारले जात. नवीन माहिती समजून घेण्यात येत. सध्या बदलत्या काळानुसार ग्रामीण भागातील ही दवंडीची पद्धतहीही पूर्णपणे बदलली आहे. दवंडीवाला घंटेएेवजी लहान साऊंड बॉक्स गळ्यात अडकून ध्वनिक्षेपकावरून सर्वसामान्यांना माहिती देत आहे.

हेही वाचा: Pune : कर्मयोगी कारखाना पंचवार्षीक निवडणूकीचे बिगुल वाजलं

बेडकिहाळ ग्राम पंचायतीमधील सफाई कामगार सुभाष लोखंडे हे गेल्या सात वर्षांपासून ग्राम पंचायतीकडून येणाऱ्या सूचना व माहिती मराठी व कन्नडमधून देत आहेत. या बदलत्या काळानुसार आता दवंडीची पद्धतही चागंलीच प्रचलित होत आहे.

साऊंड बॉक्सच्या सहाय्याने आपण ग्राम पंचायतीकडून येणारी माहिती व सूचना सर्वसामान्यांना गावात फिरून देत आहे. गावातील सर्व चौका-चौकातून माहिती देण्यासाठी चार-पाच तास लागतात.

-सुभाष लोखंडे, ग्राम पंचायत कर्मचारी, बेडकिहाळ पाटील

loading image
go to top