esakal | इंदापूर: तक्रार निवारण दिनी ६६ तंटे मिटविण्यात पोलिसांना यश
sakal

बोलून बातमी शोधा

indapur

इंदापूर: तक्रार निवारण दिनी ६६ तंटे मिटविण्यात पोलिसांना यश

sakal_logo
By
राजकुमार थोरात

इंदापूर : पुणे जिल्ह्याचे कार्यक्षम पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये आज गुरुवार (ता.९) रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३९ गावांमधील १३८ तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते.

बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातरे, पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, नितीन लकडे यांच्या उपस्थितीमध्ये पोलिसांनी तक्रारी ऐकून घेतल्या १३८ अर्जापैकी ६६ अर्जावरती समजोतीने तोडगा काढून मिटविण्यात आले.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीवर ६ जणांकडून दोन अडीच महिने लैंगिक अत्याचार

यामध्ये २९ वर्षांपासून सुरु असलेला रस्त्याचा वाद १ तासामध्ये मिटविण्यामध्ये पोलिसांना यश आले. १९९२ पासून शेळगाव गावातील वायसे वस्तीवरील नंदा छगन वायसे व दिलीप बयाजी वायसे, अर्जुन बयाजी वायसे, अशोक बयाजी वायसे, नामदेव वायसे यांच्यामध्ये रस्त्याच्या ७०० मीटर लांबीच्या रस्त्याच्या कारणावरुन वादावादी होत होती.

साहाय्यक फौजदार रतिलाल चौधर यांनी बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे सदरच्या प्रकरणाची माहिती सांगितली. पोलिसांनी रस्त्याच्या वादावर कायमचा तोडगा काढून २९ वर्षाचा वाद मिटविला.

loading image
go to top