esakal | बेळगाव : मोदक आणि फुलांना प्रचंड मागणी, दिवसभरात लाखोंची उलाढाल
sakal

बोलून बातमी शोधा

market

बेळगाव : मोदक आणि फुलांना प्रचंड मागणी, दिवसभरात लाखोंची उलाढाल

sakal_logo
By
सकाळ वृतसेवा

बेळगाव : गणेशोत्सवाला सुरुवात होताच गुरुवारी विविध प्रकारची फुले व मोदकांची मागणी प्रचंड वाढली असून दिवसभरात मोदक व फुले खरेदी करण्यासाठी ठिक ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली. याचबरोबर काही ठिकाणी तयार पुरणपोळी व इतर प्रकारचे साहित्य विक्रतेही दिसून येत होते.

गणेशोत्सव काळात घरांमध्ये मोदक तयार केले जातात. मात्र गेल्या काही वर्षांपासून अनेक जण मिठाई दुकानांमध्ये मिळत असलेले मोदक खरेदी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे शहरातील मिठाई दुकानदार वेग वेगळ्या प्रकारचे मोदक तयार करून ग्राहकांना आकर्षित करून घेत आहेत. शहरातील विविध मिठाई दुकान दुकानांमध्ये स्ट्रोबेरी, पिस्ता, मँगो , चॉकलेट, खवा, अंजिर, मिल्क, तळलेळे मोदक, काजु मोदक यासह गूळ खोबऱ्यातून तयार करण्यात आलेले मोदक विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे ग्राहक देखील मोदक खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा: अखेर मनोहरमामाला बारामती पोलिसांनी साताऱ्यात पकडले

याचबरोबर तयार पुरण पोळी खरेदी करण्यासाठीही ग्राहकानी गर्दी केल्याची माहिती मिठाई दुकानदारांनी दिली आहे. तसेच चवडा, करंजी यांनीची मागणी वाढली यामुळे शहराच्या सर्वच भागातील मिठाई दुकानांमध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. तसेच बुधवार पासूनच फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. त्यामुळे फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.

तसेच गुरुवारी दुपारपर्यंत फुले खरेदी करण्यासाठी गर्दी होती. मात्र त्यानंतर अनेक ठिकाणी फुले संपली आहेत असे सांगितले जात होते. मात्र दररोज दहा रुपयांना मिळणारा हार 40 रुपयांपर्यंत विकला जात होता त्या बाबत मात्र नागरिकातून प्रचंड नाराजी व्यक्त झाली. गेल्यावर्षीपेक्षा यावेळी गणेशोत्सवात अधिक प्रमाणात खरेदी झाल्याची माहिती फूल विक्रेत्यांमधून दिली जात आहे.

स्टोबेरी, पिस्ता, मँगो , चॉकलेट, खवा, अंजिर, मिल्क तळलेळे मोदक, काजु मोदक यासह विविध प्रकारच्या मोदकांना सकाळपासूनच मागणी होती. त्यामुळे दिवसभरात इतर पदार्थांपेक्षा मोदक खरेदीवर नागरिकांचा भर होता. येणाऱ्या दिवसांतही चांगली मागणी असेल अशी अपेक्षा आहे

- मोहन चव्हाण पाटील, मिठाई व्यावसाईक

loading image
go to top