बेळगाव : गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

मालवाहू वाहनावर कारवाई करून त्याच्याकडून ४ किलो ५६३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
cannabis
cannabis sakal

बेळगाव : गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी (ता. २९) दुपारी साडेचारच्या सुमारास सुतगट्टी गावानजिक पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर अबकारी खात्याने ही कारवाई केली आहे. संशयितांकडून गांजासह १ मालवाहू टेम्पो असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

राजेसाब दस्तगीरसाब हनगंडी (वय ४२, रा. बनहट्टी, ता. बागलकोट) आणि हुसेनसाब डी. हनगंड (रा. महालिंगपूर, ता. व जि. बागलकोट) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. बेकायदेशीररित्या गांजाची बेळगावला तस्करी केली जाणार आहे, अशी माहिती अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अबकारी पोलीस निरीक्षक लिंगराज के. यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुतगट्टी गावानजिकच्या सेवा रस्त्यावर सापळा रचला होता.

मालवाहू वाहनावर कारवाई करून त्याच्याकडून ४ किलो ५६३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याचबरोबर तस्करीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांवर अंमली पदार्थ तस्करीविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com