esakal | 'मराठीविरुध्द मराठीचा 'भाजप'लाच फायदा'; कॉंग्रेसच्या जारकीहोळींचं मोठं विधान
sakal

बोलून बातमी शोधा

'मराठीविरुध्द मराठीचा 'भाजप'लाच फायदा'

महापालिका निवडणुकीत भाजपचे ३५ उमेदवार विजयी झाले. यामागे फार मोठे लॉजिक घडलेले नाही.

'मराठीविरुध्द मराठीचा 'भाजप'लाच फायदा'

sakal_logo
By
महेश काशिद

बेळगाव : महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसने समाधानकारक यश मिळवले आहे. खऱ्या अर्थाने फटका महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषक उमेदवारांना बसला आहे. अंतर्गत मतभेदामुळे मतांची विभागणी झाली आणि उमेदवार हरले. त्याचा फायदा भाजपाने घेतल्याचे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

आरटीओ सर्कलमधील कॉंग्रेस कार्यालयात आज (८) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिका निवडणुकीत भाजपचे ३५ उमेदवार विजयी झाले. यामागे फार मोठे लॉजिक घडलेले नाही. याला निव्वळ महाराष्ट्र एकीकरण समिती, मराठी भाषकांतील अंतर्गत लाथाळ्या कारणीभूत आहेत. मराठी मतांची विभागणी झाली आणि त्याचा लाभ भाजप उमेदवारांना मिळाला. महापालिका निवडणुकीत आमची शक्ती किती होती, तेवढ्या जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा: चिपी विमानतळाचं श्रेय आघाडीचं भाजपनं दिशाभूल करु नये - राष्ट्रवादी

पक्षाने 45 पेक्षा अधिक जागा लढवल्या. यात पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि अपक्ष उमेदवार मिळून १५ जागांच्या जवळपास पोचल्या आहेत. बेळगाव उत्तर आणि दक्षिणमधील समन्वय अभावामुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपने 35 जागा जिंकल्या. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. काँग्रेसने पक्षाच्या चिन्हावार निवडणूक लढवली व मिळालेले यश समाधानकारक आहे.

निवडणुकीचा निर्णय घेण्यात आला, तेव्हाच केपीपीसीला महापालिका निवडणुकीत पक्षाला १५ जागा मिळतील, अशी माहिती दिली होती. यानुसार त्याच्या जवळपास जागा पक्षाला मिळाल्या आहेत. पक्षाला बेळगाव दक्षिणमध्ये आठ, बेळगाव उत्तरमध्ये तीन आणि अपक्ष पाच जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत पक्षाला कोठे यश मिळाले आणि कोठे फटका बसला आहे, त्याची गोळीबेरीज केली जाईल, अशी माहिती जारकीहोळी यांनी दिली.

हेही वाचा: कोरोनानं झालेल्या मृत्यूंसाठी SCनं नाकारली नुकसान भरपाई; म्हटलं...

loading image
go to top